Houthi Missile Attack Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

Houthi Missile Attack Saudi Arabia: मध्य पूर्वेत महायुद्धाचा भडका! हूतींच्या ड्रोन-मिसाईल हल्ल्याने पुन्हा हादरला सौदी अरेबिया; 3 शहरांमध्ये इमर्जन्सी जाहीर

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait: इराण-अमेरिका आणि इस्रायल-लेबनॉन यांच्यातील तणावानंतर आता मध्य पूर्वेतील युद्ध अधिक भयानक वळणावर पोहोचले आहे.

Manish Jadhav

Houthi Missile Attack Saudi Arabia Khamis Mushait: इराण-अमेरिका आणि इस्रायल-लेबनॉन यांच्यातील तणावानंतर आता मध्य पूर्वेतील युद्ध अधिक भयानक वळणावर पोहोचले आहे. येमेनमधील इराणसमर्थित हूती विद्रोही आणि सौदी अरेबिया आता थेट आमने-सामने आले आहेत. हूती विद्रोह्यांनी सौदी अरेबियाच्या शहरांवर आणि लाल समुद्रातील महत्त्वाच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले सुरुच ठेवले आहेत. काल रात्री हूती विद्रोह्यांनी नैऋत्य सौदी अरेबियातील खमीस मुशैत शहराला लक्ष्य करत प्राणघातक ड्रोन आणि शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ला चढवला.

या क्षेपणास्त्र हल्ल्यात खमीस मुशैत येथील अत्यंत महत्त्वाचा लष्करी एअरबेस थेट हादरला असून, 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 7 निवासी घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.

सौदी अरेबियाच्या लष्करी सूत्रांनुसार, खमीस मुशैतवरील हा हल्ला येमेनमध्ये सौदी अरेबियाने (Saudi Arabia) केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हूतींनी केला. सध्या तात्पुरता धोका टळला असला तरी परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी प्रशासनाने खमीस मुशैतसह आभा, ताइफ, जेद्दाह आणि जाजान या प्रमुख शहरांमध्ये इमर्जन्सी अलर्ट जारी केला. संपूर्ण देशात लष्करी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी, 14 सप्टेंबर रोजी हूती विद्रोह्यांनी दक्षिण सौदी अरेबियातील आभा, खमीस मुशैत आणि ताइफसारख्या नागरी वस्त्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती. या भीषण प्रक्षोभाला चोख प्रत्युत्तर देत सौदी अरेबियाने येमेनमध्ये हूतींच्या लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले होते. सौदीच्या लढाऊ विमानांनी हूतींचे विमान हँगर, प्रगत रडार सिस्टीम, धावपट्ट्या आणि दारुगोळ्याची गोदामे बॉम्बफेक करुन उद्ध्वस्त केली होती.

या प्रत्याक्रमणानंतर संतापलेल्या हूतींनी सौदीच्या लष्करी तळांवर थेट हल्ला चढवून युद्धाची तीव्रता कैक पटीने वाढवली. लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि आता सौदीच्या भूमीवरील थेट क्षेपणास्त्र वर्षावामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत महायुद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या वाढत्या तणावामुळे इंधनाच्या पुरवठ्यावर आणि सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI कडून IPL 2027 ऑक्शनची तारीख जाहीर, 16 डिसेंबरला गोव्यात खेळाडूंवर लागणार कोटींची बोली; पैशांचा पडणार पाऊस

Goa Fire Services Sports Festival: अग्निशमन जवान मैदानात उतरणार! पणजीत 14 व्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन; चार दिवस विविध स्पर्धांचा थरार

Saudi Arabia Airstrike: मध्यपूर्वेत युद्धाचा भडका! सौदीने येमेनवर 24 तासांत डागली 81 क्षेपणास्त्रे; 15 जणांचा मृत्यू, हुतींचे 60 लष्करी तळ उद्ध्वस्त

Under 19 Cricket: 'देशासाठी करंडक जिंकण्याची अखेरची संधी'; गोव्याच्या व्यंकटची आशिया विजेतेपदामागची प्रेरणादायी कहाणी

रक्षकच भक्षक बनले तर मुलांनी आदर्श कुणाचा घ्यायचा? गोव्यातील घटनांनी व्यवस्था आणि समाजासमोर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT