Iran America Conflict: 5 तेल टँकर्स खाक झाल्यानंतर इराणचा मोठा गेम! अमेरिकेच्या 21 कोटींच्या 'ड्रोन पाणबुडी'वर केला कब्जा; व्हिडिओ शेअर VIDEO

IRGC Claims Capturing US Underwater Drone: इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स'ने होर्मुझच्या खाडीत अमेरिकेची एक मानवरहित 'अंडरवॉटर ड्रोन पाणबुडी' यशस्वीपणे ताब्यात घेतल्याचा दावा केला.
IRGC Claims Capturing US Underwater Drone
IRGC Claims Capturing US Underwater DroneDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

IRGC Claims Capturing US Underwater Drone: अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष आता अधिकच पेटला असून, जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या खाडीत एक नवा आणि खळबळजनक प्रकार समोर आला. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स'ने होर्मुझच्या खाडीत अमेरिकेची एक मानवरहित 'अंडरवॉटर ड्रोन पाणबुडी' यशस्वीपणे ताब्यात घेतल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर इराणी प्रसारमाध्यमांनी या कारवाईचा एक व्हिडीओ सार्वजनिक करत अमेरिकेच्या अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाला मोठा सुरुंग लावल्याची बढाई मारली आहे.

इराणी लष्कराच्या दाव्यानुसार, त्यांनी ताब्यात घेतलेले वाहन अमेरिकेच्या 'अँडुरिल' या संरक्षण कंपनीने बनवलेले 'डाइव्ह-एलडी' हे मानवरहित सागरी ड्रोन आहे. सुमारे 19 फूट लांब असलेले हे ड्रोन समुद्रतळाचे सर्वेक्षण करणे, गुप्त माहिती गोळा करणे, सागरी सुरुंगांची ओळख पटवणे आणि पाण्याखालील महत्त्वाच्या पाईपलाईन्सवर नजर ठेवण्यासाठी वापरले जाते. हे ड्रोन सलग 10 दिवस समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत काम करु शकते आणि याची किंमत सुमारे 25 लाख डॉलर (अंदाजे 21 कोटी रुपये) आहे. इराणने अमेरिकेच्या याच अत्याधुनिक वाहनाला रोखल्याचा दावा करत व्हिडिओ प्रसिद्ध केला, जरी या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.

IRGC Claims Capturing US Underwater Drone
Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

दुसरीकडे, अमेरिकेने इराणचा (Iran) हा दावा फेटाळून लावत या संपूर्ण घटनेचे वेगळे स्पष्टीकरण दिले. पेंटागन आणि अमेरिकन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अंडरवॉटर ड्रोन सागरी सर्वेक्षण करत असताना एक दिवसापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. हे ड्रोन अत्यंत जुन्या मॉडेलचे होते आणि त्यात कोणताही संवेदनशील डेटा किंवा रडार यंत्रणा नव्हती. त्यामुळे इराणने कोणत्याही सक्रिय मोहिमेदरम्यान याला पकडलेले नसून, केवळ बिघडलेल्या आणि पडलेल्या उपकरणाला ताब्यात घेतले, असे स्पष्ट करत वॉशिंग्टनने हा प्रकार क्षुल्लक ठरवण्याचा प्रयत्न केला.

IRGC Claims Capturing US Underwater Drone
Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

दरम्यान, होर्मुझच्या खाडीतील या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही इराणवर कठोर आर्थिक व लष्करी कारवाईचा बडगा उगारला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने इराणच्या 5 महाकाय तेल टँकर्सना उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली असून, अमेरिकन ट्रेझरी विभागाने इराणवर दबाव वाढवण्यासाठी 27 इराणी एअरलाइन्सवर कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे आखाती देशांमधील परिस्थिती अधिकच चिंताजनक आणि युद्धाच्या छायेत अडकलेली दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com