75 Hard Challenge Dainik Gomantak
ग्लोबल

75 Hard Challenge: अति पाणी प्यायली अन्...! '75 हार्ड' फिटनेस चॅलेंजने टिकटॉकरला थेट पोहचवले रुग्णालयात

75 Hard Challenge: आजकाल '75 हार्ड' चॅलेंज संबंधित अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम आणि टिक टॉकवर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यातून विविध घटना समोर येत आहेत.

Ashutosh Masgaunde

TikToker in Canada Hospitalised after Drinking too Much Water for 75 Hard Challenge: अलिकडेच इंटरनेटवर व्हायरल झालेल्या '75 हार्ड' या फिटनेस चॅलेंजने अनेकांना अक्षरश: वेड लावले आहे.

तुम्हालाही इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्याची आवड असेल, तर तुम्हाला आजकाल '75 हार्ड' नावाच्या चॅलेंज किंवा हॅशटॅगची सारखे दिसत असेल.

तुमच्या माहितीसाठी सांगतो, 75 हार्ड हे एक मेंटल फिटनेस चॅलेंज आहे. '75 हार्ड' नावाच्या या चॅलेंजमध्ये सहभागी झाल्यास 75 दिवस दररोज सुमारे चार लिटर पाणी पिण्याटे टार्गेट असते.

मात्र दुसरीकडे कॅनडातील एका टिकटॉकरला हे व्हायरल फिटनेस चॅलेंज चांगलेच महागात पडले आहे. या चॅलेंजमध्ये सहभगी झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांत तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

काय आहे '75 हार्ड' चॅलेंज

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या चॅलेंजमध्ये सहभागी झाल्यानंतर अल्कोहोलचे सेवन टाळणे गरजेचे असते. या दरम्यान, तुम्हाला निरोगी डाएट प्लॅन तयार करावा लागतो आणि त्याचे पालन करावे लागेल. त्यात दारू आणि चिट मिल नसावे.

या फिटनेस चॅलेंजसाठी तुम्ही आहारतज्ज्ञांचीही मदत घेऊ शकता. यासोबतच 75 दिवसांसाठी 45 मिनिटे इनडोअर आणि आऊटडोअर वर्कआउट, कोणत्याही व्यक्तिमत्व विकासाच्या पुस्तकाची 10 पाने वाचणे आणि आहाराचे पालन करणे, दररोज 4 लिटर पाणी पिणे आणि सेल्फी घेणे हाही नियम आहे.

विशेषत: हा फिटनेस प्रोग्राम 2019 मध्ये पॉडकास्टर आणि सप्लिमेंट कंपनीचे सीईओ अँडी फ्रिसेला यांनी तयार केला होता.

मिशेल फेअरबर्नने (Michelle Fairburn) सोमवारी टिकटॉकवर या चॅलेंज संबंधीत एक व्हिडिओ शेअर केला. तिने सांगितले की, तिला अति पाणी पिल्यामुळे विषबाधा झाल्याचे जाणवले. काही तासांत तीन ते चार लिटरपेक्षा जास्त पाणी पिल्यानंतर होऊ शकते.

फेअरबर्नने पुढे सांगितले की, तिच्या फिटनेस चॅलेंजच्या १२व्या दिवशी, जेव्हा ती रात्री झोपायला जात होती, तेव्हा तिला बरे वाटत नव्हते. दरम्यान, ती रात्री अनेकवेळा उठून बाथरूमला गेली. दरम्यान, तिला जेवण देखील करता येत नव्हते.

मिशेल फेअरबर्नने सांगितले की, मी 75 हार्ड चॅलेंज फॉलो करत आहे, त्यामुळे मी जास्त प्रमाणात पाणी पिते.

दरम्यान, अनेक चाचण्यांनंतर डॉक्टरांनी सांगितले की माझ्या शरिरात सोडियमची कमतरता आहे, जी खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे मला डॉक्टरांनी दररोज चार लिटर पाण्याऐवजी अर्धा लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला.

मेयो क्लिनिकच्या मते, सोडियम कमी होणे किंवा हायपोनेट्रेमिया उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. मिशेल फेअरबर्न म्हणाल्या की, मी अजूनही 75 हार्ड चॅलेंज फॉलो करत आहे. मी हार मानणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT