Pakistan Blast
Pakistan BlastDainik Gomantak

Pakistan Blast Video: पाकिस्तानात राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात स्फोट; 50 जण ठार, 200 हून अधिक जखमी

पाकिस्तानमधील राजकीय पक्ष JUI-F च्या कार्यकर्ता परिषदेत बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 50 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Atleast 50 Killed in Bomb Blast In Pakistan:

पाकिस्तानातून एक भयंकर बातमी समोर आली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल (JUI-F) च्या कामगार परिषदेत झालेल्या स्फोटात किमान 50 लोक ठार झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

यावेळी 200 हून अधिक लोक जखमी झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम सुरू असताना स्फोट झाला. त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

स्फोटानंतरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान जखमी आणि मृतांचा आकडाही वाढू शकतो.

जेयूआयएफचे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला यांनी जखमींसाठी आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजना करण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

Pakistan Blast
UAE Lucky Draw: भारतीयाचं नशीब यूएईत उजळलं; 25 वर्षे दर महिना मिळणार तब्बल 'इतके' लाख रुपये

जेयूआयएफचे ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला म्हणाले हा "जिहाद नाही. हा दहशतवाद आहे. जेयूआय-एफच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झालेला हा पहिला स्फोट नाही."

बाजौरमध्ये यापूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांबाबत सरकारी संस्थांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारने या स्फोटाकडे लक्ष द्यावे आणि या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, असे आवाहन हमदुल्लाह यांनी केले.

हा स्फोट पेरलेल्या बॉम्बमुळे झाला की आत्मघातकी स्फोट होता हे सध्या तरी समजू शकलेले नाही.

Pakistan Blast
UAE Lucky Draw: भारतीयाचं नशीब यूएईत उजळलं; 25 वर्षे दर महिना मिळणार तब्बल 'इतके' लाख रुपये

या वर्षात पाकिस्तानमध्ये अनेक स्फोट झाले असून, त्यापैकी बहुतांश आत्मघाती स्फोट होते. शिया मशिदीला लक्ष्य करून शेवटचे काही स्फोट झाले.

काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर टीटीपीसारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

टीटीपीनेही सरकारसोबतचा युद्धविराम संपवला आहे, त्यामुळे आगामी काळात आणखी प्राणघातक हल्ल्यांचा धोका वाढला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com