Mexico Cartel Violence 11 Killed Dainik Gomantak
ग्लोबल

Mexico Violence: ड्रग माफियाच्या अटकेनंतर रक्तरंजित धुमश्चक्री, अंदाधुंद फायरिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू; मेक्सिकोत गुन्हेगारी टोळीचा हैदोस!

Mexico Cartel Violence 11 Killed: मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यात कुख्यात ड्रग माफिया फॉस्टो इसिड्रो मेझा फ्लोरेस उर्फ 'एल चापो इसिड्रो' याच्या अटकेनंतर भीषण हिंसाचार उसळला असून, या धुमश्चक्रीत 11 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Mexico Cartel Violence 11 Killed: मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यात कुख्यात ड्रग माफिया फॉस्टो इसिड्रो मेझा फ्लोरेस उर्फ 'एल चापो इसिड्रो' याच्या अटकेनंतर भीषण हिंसाचार उसळला असून, या धुमश्चक्रीत 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कार्टेलच्या सात संशयित बंदूकधाऱ्यांसह मेक्सिकोच्या चार सैनिकांचा देखील समावेश आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने मेक्सिकन सुरक्षा दलांनी राबवलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये एफबीआयच्या 'टॉप 10 मोस्ट वॉन्टेड' यादीतील या गुन्हेगाराला 21 नोव्हेंबर 2026 रोजी अटक करुन मेक्सिको सिटी येथे हलवण्यात आले.

गुआसावे परिसरात 20 नोव्हेंबरच्या सायंकाळी सुरु झालेल्या या सशस्त्र संघर्षामुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. लष्करी हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या साहाय्याने राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना स्फोटके आणि जोरदार गोळीबाराचा सामना करावा लागला. कार्टेलच्या सदस्यांनी किमान दहा ठिकाणी वाहने पेटवून रस्ते रोखून धरल्याने या माफियाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना शनिवार सकाळपर्यंत झुंजावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जळणारी वाहने, उद्ध्वस्त दुकाने आणि जीव वाचवण्यासाठी धावणारे सामान्य नागरिक दिसत आहेत.

अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अमेरिकेने मेझा फ्लोरेसवर 50 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. स्वतःची गुन्हेगारी टोळी उभारण्यापूर्वी त्याने 'बेल्ट्रान-लेवा' कार्टेलचे नेतृत्व केले होते. या यशस्वी कारवाईबद्दल अमेरिकन राजदूत रोनाल्ड जॉन्सन यांनी दोन्ही देशांच्या समन्वयाचे कौतुक केले, तर मेक्सिकोचे सुरक्षा सचिव ओमार गार्सिया हारफुच यांनी सिनालोआमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले.

दरम्यान, केवळ प्रमुख नेत्यांना अटक केल्याने संपूर्ण गुन्हेगारी जाळे नष्ट होत नाही, उलट टोळीतील वारसा हक्कावरुन नवीन रक्तरंजित संघर्ष भडकण्याचा धोका असतो, असा इशारा सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड सॉसेडो यांनी दिला. मेझा फ्लोरेस हा सत्तासंघर्षात अडकलेल्या 'लॉस मायोस' गटाचा सहकारी असल्याने या भागात अस्थिरता अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: खाकी वर्दीचा धाक आता संपला?

Crime News: आसगाव प्रकरणाची पुनरावृत्ती? आश्वे-मांद्रेतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Goa Politics: काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 40 मतदारसंघांत अर्ज मागवले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; चोडणकरांनी स्पष्टच सांगितले

Accident News: चालकाला झोप लागली अन् होत्याचे नव्हते झाले! खाटूश्यामजीच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास ठरला शेवटचा; भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू

Daily Horoscope: संयम, बचत अन् शिस्तीचा दिवस! 'या' राशींसाठी रविवार ठरणार वरदान; अहंकार बाजूला ठेवून घ्या संधीचा फायदा

SCROLL FOR NEXT