Goa Politics: काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 40 मतदारसंघांत अर्ज मागवले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; चोडणकरांनी स्पष्टच सांगितले

Goa Congress Alliance: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांच्या मनात आपल्यावर अन्याय झाला, आम्हाला डावलण्यात आले, असे वाटू नये याकरिता हे अर्ज मागविण्यात आले आहेत.
Goa Congress Alliance
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: समविचारी पक्षांसोबत युतीविषयी बोलणी अंतिम टप्प्यात आली असतानाच आता कॉंग्रेसने सर्व चाळीसही मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सोमवारपासून (ता. २३) सुरुवात करण्याचे ठरविले आहे.

यातून आमच्याकडे सर्व मतदारसंघांत उमेदवार आहेत, असे चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेस पक्ष आहे. विशेष म्हणजे, हे उमेदवारी अर्ज निःशुल्क आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्ताही आपला उमेदवारी अर्ज सादर करू शकणार आहे.

Goa Congress Alliance
FC Goa: तयारीला वेळ कमी, तरी एफसी गोवा सज्ज; नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीसाठी नव्या प्रशिक्षकांचा विश्वास

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याविषयी ‘गोमन्तक’ला सांगितले की, सामान्य कार्यकर्ताही अर्ज करू शकतो आणि कदाचित त्याचे समाजातील असलेले स्थान किंवा लोकसंपर्क पाहून त्याला पुढे उमेदवारीही मिळू शकते. इच्छुक उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्ताही उमेदवारीसाठी अर्ज करू शकणार आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज गट समिती, जिल्हा समिती आणि प्रदेश काँग्रेस समितीकडे सादर करू शकणार आहे. गोवा रक्षण यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पक्षाच्या कार्यकर्त्याला निश्चित बळ मिळाले आहे.

आता ‘गोवा संरक्षण अभियान’

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये किंवा त्यांच्या मनात आपल्यावर अन्याय झाला, आम्हाला डावलण्यात आले, असे वाटू नये याकरिता हे अर्ज मागविण्यात आले आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा आमचा सदोदित प्रयत्न आहे. लवकरच राज्यात गोवा संरक्षण अभियान राबविले जाणार आहे, असे चोडणकर म्हणाले.

भाजपसमोर सक्षम पर्याय निर्माण करू!

प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, की राज्यातील भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने युतीसाठीही पावले उचलली आहेत. त्यानुसार रिव्हॉल्युशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड पक्षासोबत बोलणी झाली आहे. त्याविषयी अंतिम टप्प्यातील बोलणी लवकरच होईल. युतीच्या माध्यमातून गोव्यात भाजपसमोर सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी काँग्रेस तडजोड करण्यासही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Goa Congress Alliance
Goa Politics: महिला मोर्चा केवळ संघटना नाही, तो एक 'ब्रँड' आहे; मग संघर्षाची धार का बोथट झाली?

आम्ही सर्व चाळीसही मतदारसंघांत उमेदवार देऊ शकतो; परंतु ज्याठिकाणी आमची बाजू कमकुवत आहे, त्याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आपली ताकद युतीच्या उमेदवारामागे लावणार आहे.

- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.