Viral Fight Video: Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: संसद की कुस्तीचा आखाडा? लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महिला खासदारांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींचे केस ओढले अन् थप्पडही लगावले

Viral Fight Video: लोकशाहीचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत वैचारिक वाद होणे सामान्य आहे, मात्र मेक्सिकोच्या संसदेत असा काही प्रकार घडला ज्याने संपूर्ण जग हादरले.

Manish Jadhav

Mexico Parliament Fight: लोकशाहीचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत वैचारिक वाद होणे सामान्य आहे, मात्र मेक्सिकोच्या संसदेत असा काही प्रकार घडला ज्याने संपूर्ण जग हादरले. एका महत्त्वाच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना महिला खासदारांमध्ये अचानक बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या महिला खासदारांनी एकमेकींचे केस ओढले, धक्काबुक्की केली आणि एकमेकींच्या कानशिलातही लगावून दिल्या. या अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून जगभरातून यावर टीका होत आहे.

नेमकी घटना काय?

मेक्सिको सिटीच्या संसदेत 'InfoCDMX' या शहराच्या स्वतंत्र पारदर्शक संस्थेला बरखास्त करण्याच्या आणि तिची कामे सरकारी एजन्सीकडे सोपवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु होती. सत्ताधारी 'मोरेना' पार्टी आणि राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबॉम यांच्या पक्षाने या सुधारणा प्रस्तावाचा आग्रह धरला होता. मात्र, विरोधी 'नॅशनल ॲक्शन पार्टी'ने याला कडाडून विरोध केला. विरोधकांच्या मते, यामुळे पारदर्शकता संपेल आणि सरकारची उत्तरदायित्व कमी होईल.

पोडियमवर कब्जा आणि हाणामारी

वाद वाढल्यानंतर नॅशनल ॲक्शन पार्टीच्या महिला खासदारांनी मुख्य व्यासपीठावर (पोडियम) जाऊन कब्जा केला. ही मेक्सिकोमधील निषेध व्यक्त करण्याची एक जुनी पद्धत आहे. मात्र, जेव्हा सत्ताधारी मोरेना पार्टीच्या महिला आमदार हे व्यासपीठ रिकामे करण्यासाठी तिथे पोहोचल्या, तेव्हा वादाचे रुपांतर थेट 'मल्लयुद्धा'त झाले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे की, किमान पाच महिला खासदार एकमेकींना जोरात धक्के मारत आहेत. संतापलेल्या खासदारांनी एकमेकींचे केस धरुन खेचले आणि जोरदार थप्पड लगावले. संसदेतील (Parliament) इतर पुरुष खासदार आणि कर्मचारी मध्ये पडून ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे 'नाट्य' कैद करत होते. या गोंधळामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.

विरोधकांचा बहिष्कार, सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव मंजूर

हा गोंधळ शमल्यानंतर विरोधकांनी निषेध म्हणून सभागृहातून काढता पाय घेतला. मात्र, सत्ताधारी मोरेना पक्षाने विरोधकांच्या अनुपस्थितीत बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयामुळे आता 'InfoCDMX' ही स्वतंत्र संस्था बरखास्त होणार असून तिची सर्व सूत्रे सरकारी नियंत्रक कार्यालयाकडे जातील.

राष्ट्राध्यक्षांकडून निषेध

मेक्सिकोच्या (Mexico) राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबॉम यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी याला 'वाईट तमाशा' असे संबोधले. त्या म्हणाल्या, "कोणालाही असहमती दर्शवण्याचा किंवा व्यासपीठावर जाऊन निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारे हिंसा करणे निंदनीय आहे." दरम्यान, दोन्ही पक्षांनी या हिंसेसाठी एकमेकांना जबाबदार धरले. विरोधी खासदार डॅनिएला अल्वारेझ यांनी याला "अश्लील आणि आक्रमक" वागणूक म्हटले, तर सत्ताधारी प्रवक्त्यांनी विरोधकांनीच हिंसेला चिथावणी दिल्याचे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

Porvorim News: पर्वरीच्या रस्त्यावर 'बिअर'चा पूर! धावत्या ट्रकवरून बॉक्स कोसळले, काचेच्या तुकड्यांमुळे वाहतूक धोक्यात

SCROLL FOR NEXT