Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

Viral Student Video: जर तुम्ही देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर तुमच्या फीडवर दररोज अशा प्रकारचे व्हिडिओ येत असतील.
Viral Student Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Funny Student Video: सोशल मीडियावर दररोज अतंरगी व्हिडिओ व्हायरल होतात. जर तुम्ही देखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर तुमच्या फीडवर दररोज अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणे कठीण होईल. हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, ज्यांचा क्लास बंक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला दिसतो.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Viral Student Video
रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक मुलगा आणि मुलगी क्लास बंक करुन शाळेतून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत. पहिल्यांदा शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन ते दोघे दुसऱ्या बाजूला असलेल्या एका टीनच्या शेडवर उतरले. त्या शेडवरुन खाली उतरण्यासाठी मुलगा एका दोरीचा वापर करतो. तो व्यवस्थितपणे दोरी पकडून खाली उतरतो. यानंतर मुलगी खाली उतरणार इतक्यात तिला अचानक काहीतरी दिसले आणि ती घाबरुन शेडवरुन पळून जाते. कॅमेरा दुसऱ्या बाजूला फिरवताच खाली चक्क मास्तर उभे असल्याचे दिसले. क्लास बंक केल्यामुळे त्या मुलाचा प्लॅन फसल्याचे स्पष्ट झाले.

मास्तरांनी मुलाला पकडले आणि क्लास बंक करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्याची चांगलीच खोड मोडली. मास्तरांना अचानक समोर पाहून तो मुलगा पूर्णपणे हतबल दिसला.

Viral Student Video
गोव्यात 'दीपवीर'चा शाही अंदाज! चुलत भावाच्या लग्नाला लावली हजेरी, सून दीपिकाने पार पाडल्या जबाबदाऱ्या; Video Viral

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मास्तरांनी मुलाला रंगेहाथ पकडल्याचा आणि मुलीने पळ काढल्याचा हा मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 'X' वर @corporatebanda नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भाई के साथ बुरा हुआ' (भावाबरोबर खूप वाईट झाले). ही बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 71 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. हा व्हिडिओ कधी आणि कोणत्या शाळेतील आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, परंतु शाळेतील मुलांच्या क्लास बंक करण्याच्या अयशस्वी प्रयत्नामुळे हा व्हिडिओ खूप विनोदी आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

Viral Student Video
VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

अनेक यूजर्संनी कमेंटमध्ये लिहिले की, 'भिंत ओलांडताना मुलगी खूप हुशार निघाली, तिने धोका ओळखला आणि पळ काढला, पण बिचारा मुलगा अडकला.' त्याचवेळी, हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या शाळेतील क्लास बंक करण्याच्या आठवणी ताज्या झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com