Ajit Mohan  Dainik Gomantak
ग्लोबल

Meta (फेसबुक) चे भारत प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा

Meta India Head: अजित मोहन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपमध्ये सामील होण्यासाठी मेटाचे भारत प्रमुख पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Ajit Mohan Resigns: मेटा प्लॅटफॉर्म्सने जाहीर केले की, त्यांचे भारत प्रमुख अजित मोहन यांनी राजीनामा दिला आहे. खरं तर, अजित मोहन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपमध्ये सामील होण्यासाठी मेटाचे भारत प्रमुख पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अजित मोहन जानेवारी 2019 मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून फेसबुक इंडियात रुजू झाले होते. कंपनीत अजित मोहन यांच्या उपस्थितीत, WhatsApp आणि Instagram ने भारतात 200 दशलक्ष यूजर्स जोडले, जे एक मोठे यश मानले जाते.

META च्या आधी, अजित मोहन यांनी स्टार इंडियाच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा Hotstar चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्षे काम केले. नंतर ते META मध्ये दाखल झाले होते.

दरम्यान, META चे ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसोहन यांनी एका निवेदनात म्हटले की, "अजित यांनी कंपनीबाहेरील संधीसाठी META मधील त्यांच्या भूमिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी आमच्या भारतातील (India) ऑपरेशन्सचे नेतृत्व केले. कोट्यवधी भारतीय व्यवसाय, भागीदार आणि लोकांची सेवा करता यावी यासाठी ते कंपनीला वाढविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आम्ही भारतासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही अजित यांच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञ आहोत. त्याचबरोबर योगदान आणि त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

SCROLL FOR NEXT