Flag Dainik Gomantak
ग्लोबल

Canada: कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जारी

Indians In Canada: कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Students in Canada: कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, 'कॅनडामध्ये द्वेषपूर्ण गुन्हे, वांशिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांसंबंधीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.'

अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले की, 'परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय उच्चायुक्तांनी हा मुद्दा कॅनडा (Canada) सरकारकडे उचलून धरला आहे. देशात घडत असलेल्या घटनांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे, परंतु या घटनांसाठी जबाबदार असलेल्यांना दोषी ठरवणे बाकी आहे.'

'दक्ष राहा आणि सतर्क राहा'

"अशा गुन्ह्यांची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारतीय नागरिक, विद्यार्थी (Students) आणि कॅनडामध्ये प्रवास/शिक्षणासाठी जाणाऱ्यांना दक्ष आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे."

येथे नोंदणी करा

अ‍ॅडव्हायझरीमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, 'कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हरच्या कॉन्सुलेट जनरलच्या संबंधित वेबसाइटवर नोंदणी किंवा 'MADAD पोर्टलवर (MADAD) नोंदणी करु शकता. त्यात पुढे म्हटले आहे की, नोंदणी केल्यास, उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासाला कोणत्याही गरजेच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत कॅनडामधील भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे सोपे होईल.

तथाकथित खलिस्तानी सार्वमतावर भारताचा घणाघात

एक दिवस अगोदर, भारताने कॅनडातील तथाकथित खलिस्तानी सार्वमतावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भारताने (India) म्हटले की हे "अत्यंत आक्षेपार्ह" आहे की, मित्र देशामध्ये कट्टरपंथी आणि अतिरेकी घटकांना अशा राजकीय हेतूने प्रेरित कारवाया करण्याची परवानगी देण्यात आली आहे.'

दुसरीकडे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, 'भारताने हे प्रकरण कॅनडाच्या प्रशासनाकडे राजनयिक माध्यमांद्वारे मांडले आहे. कॅनडासोबत हा मुद्दा पुढेही आम्ही उचलत राहणार आहोत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

SCROLL FOR NEXT