Thailand Blast News Dainik Gomantak
ग्लोबल

Thailand: थायलंडमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 20 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढू शकतो!

Thailand Blast News: थायलंडमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Manish Jadhav

Thailand Blast News: थायलंडमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एपीच्या वृत्तानुसार, मध्य थायलंडमधील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचे एका बचाव कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आकडा आणखी वाढू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुफान बुरी प्रांतातील स्थानिक बचाव कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, थायलंडमधील फटाक्यांच्या कारखान्यात यापूर्वीही मोठा स्फोट झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये थायलंडमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू तर 115 हून अधिक लोक जखमी झाले होते. नाराथिवास प्रांतातील सुंगाई कोलोक शहरातील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला होता. या स्फोटाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यावेळचे शहराचे गव्हर्नर सॅनन पोंगकसोर्न यांनी सांगितले होते की, 115 लोक जखमी झाले त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यावेळीही मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु होते.

घरे आणि दुकानांचे नुकसान

स्फोटाबाबत गव्हर्नरांनी सांगितले होते की, तपासाअंती फटाक्याच्या कारखान्यात स्फोट स्टील वेल्डिंगच्या वेळी आग लागल्याने समोर आले. स्फोटानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत होते. या स्फोटामुळे अनेक दुकाने, घरे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT