Massive building fire in Philadelphia, USA Thirteen people including children died

 

Dainik Gomantak

ग्लोबल

USA मधील Philadelphia येथे भीषण आग! लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

या घटनेनंतर आठ जणांना आगीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले

दैनिक गोमन्तक

USA Fire: अमेरिकेतील फिलाडेल्फिया (Philadelphia) शहरातील एका इमारतीला भीषण आग लागली. बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत सात मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. इमारतीमध्ये चार धोक्याची सूचना देणारी उपकरणे बसवण्यात आली होती, परंतु कोणतीही कार्यरत स्थितीत नव्हती. त्यामुळे या घटनेची माहिती उशीरा मिळाली आता दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अमेरिकेत भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरातील फेअरमाउंट भागात सकाळी 6.40 वाजता तीन मजली इमारतीत ही आग लागली. सर्वात मोठी बाब म्हणजे या आगीच्या घटनेत 7 मुलांना आपला जीव गमवावा लागला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ही आग अतिशय भीषण होती. पीडितांचे कुटुंबीय एकमेकांचे सांत्वन करत आहेत. फिलाडेल्फिया येथील जॅक्युटा पुरीफॉय यांनी तीन मजली घराला आग लागल्याने कुटुंबातील 10 सदस्य गमावले.

भीषण आगीत 13 जणांचा मृत्यू

या घटनेनंतर आठ जणांना आगीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. फिलाडेल्फियाचे महापौर जिम केनी (Mayor Jim Kenney) यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. 35 वर्षांच्या सेवेत अशी भीषण आग लागल्याचे कंपनीचे उपायुक्त क्रेग मर्फी यांनी सांगितले. सध्या आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलिस प्रशासन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT