covid19 Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोना रुग्ण वाढल्याने इस्त्रायलमध्ये पुन्हा एकदा मास्क बंधनकारक

जगभरात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे इस्त्रायलमध्ये (Israel) पुन्हा कोरोनानं डोक वर काढलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नागरिकांना (citizens) मास्क वापरणं अनिवार्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे इस्त्रायलमध्ये (Israel) पुन्हा कोरोनानं डोक वर काढलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा नागरिकांना (citizens) मास्क वापरणं अनिवार्य केले आहे. यावेळी इनडोरमध्येही मास्क घालण्याची सक्ती केली आहे. इस्त्रायलमध्ये गुरुवारी दिवसभरात 169 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं असून आतापासूनच कोरोनाला रोखण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांना अनावश्यक बाहेर पडणे टाळण्यास सांगितले आहे.

तसेच नागरिकांनी लहान बालकांना घेऊन विमान प्रवास करु नका, असंही सांगण्यात आले आहे. कोरोनाची लस घेतली असेल आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी करण्याच्या सूचनादेखील सरकारने देखील दिल्या आहेत. 80 टक्के नागरिकांचं इस्त्रायलमध्ये लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरही केोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.

इस्त्रायलमधील बिन्यामीना शहरामध्ये 122 सर्वाधिक रुग्ण आहेत. या शहरात रेड झोनदेखील घोषित करण्यात आला आहे. तर मोदीनितमध्ये 71 नवे सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तेल अविव आणि केफर सबातमध्ये नवे 36 रुग्ण आढळले आहेत. सध्या रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या 26 कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

इस्रायलमध्ये वाढता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरणावर जोर देण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक ठिकाणी (public places) मास्क घालण्यावरील बंधने शिथिल करण्यात आली होती. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले होते. मात्र देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासोबतच इस्त्रायलमध्ये विदेशी पर्यटकांची मोहिम ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे इस्त्रायलमध्ये 6,429 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रयलची लोकसंख्या सुमारे 9.3 मिलियन इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: मार्ग खुले न झाल्यास कोर्टात येण्याची याचिकाकर्त्यांना मुभा; विकसकाचा दावा हायकोर्टाने घेतला नोंदवून

Viral Video: 'हो' म्हणशील ना? 1454 फूट उंचीवर तरुणाने प्रेयसीला केलं प्रपोज; रोमँटिक क्षणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल

VIDEO: 'अमरनाथ यात्रा' दहशतवाद्यांच्या टार्गेटवर! हल्ल्याचा मोठा डाव, ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

Chandra Gochar 2026: भाग्य उजळणार, संपत्ती वाढणार! जुलैचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी ठरणार लकी; चंद्र गोचरचा चमत्कार

Brezza Facelift 'या' दिवशी भारतात होणार लॉन्च! टर्बो इंजिन, ADAS आणि प्रीमियम फीचर्ससह SUV सेगमेंटमध्ये उडवणार धुरळा? किंमत किती?

SCROLL FOR NEXT