Afghanistan Girls Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानातील भयावह वास्तव! पैशासाठी नवजात मुलींच्या लग्नाचा 'सौदा'

20 दिवसांच्या मुलींना (Girls) लग्नासाठी दिली जातेय 'ऑफर'

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानी (Taliban) राजवट आल्यापासून महिला आणि मुलींचे भविष्य गडद अंधारात गेले असल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. यातच आता एक धक्कादायक (Worst Situation in Afghanistan) बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानातील आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, 20 दिवसांच्या मुलींना लग्नासाठी ऑफर केले जात आहे. युनिसेफ (United Nations Children's Fund) ने म्हटले आहे की, विश्वसनीय रिपोर्ट्स आहेत जे दर्शवितात की, काही दिवसांच्याच मुलींना हुंड्यात पैसे घेण्याच्या बदल्यात भविष्यात लग्न करण्याची ऑफर दिली जात आहे.

दरम्यान एजन्सीने आपल्या डेटामध्ये म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये 28 टक्के मुलींचे वय 15 वर्षांच्या आधी आणि 49 टक्के मुलींचे लग्न 18 वर्षापूर्वी (Baby Girls Marriage) केले गेले आहे. 2018 आणि 2019 मध्ये केवळ हेरात आणि बगदीस प्रांतात 183 बालविवाह झाले आहेत. तसेच हजारो मुलांची विक्रीही झाली आहे. विकल्या गेलेल्या मुलांचे वय सहा महिने ते 17 वर्षांपर्यंत आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेन्रिएटा फोर (Henrietta Four) यांनी सांगितले की, या अहवालांमुळे आम्ही "खूप चिंतित" आहोत.

देशातील गरीब लोकसंख्येची संख्या वाढली

हेन्रिएटा फोर म्हणाल्या, 'आम्हाला विश्वसनीय रिपोर्ट्स प्राप्त झाला आहे की, कुटुंबे हुंड्याच्या बदल्यात भविष्यात लग्नासाठी 20 दिवसांपर्यंतच्या मुलींना देऊ करत आहेत. कोरोना महामारी दरम्यानच देशात मानवतावादी संकट (Humanitarian Crisis) निर्माण झाले असून हिवाळाही जवळ आला आहे. ते पुढे म्हणाले, 2020 मध्ये, अफगाणिस्तानची निम्मी लोकसंख्या आधीच गरीब आहे. त्यांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक अन्नही उपलब्ध होत नाही. परंतु आता आर्थिक परिस्थितीमुळे जास्तीत लोक दारिद्र्यात जात आहेत. यामुळे त्यांना पैशासाठी इतर मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. अफगाण लोक लहान मुलांना बालमजुरीसाठी पाठवत आहेत. तसेच लहान वयातील मुलींची लग्नेही लावण्यात येत आहेत.

तालिबानने शिक्षणावर घातली बंदी

तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली असून त्यामुळे परिस्थिती आणखीनच धोकादायक बनली आहे. फोर म्हणतात, 'शिक्षण हे बालविवाह आणि बालमजुरी (Child Labour) यांसारख्या नकारात्मक गोष्टींपासून सर्वोत्तम संरक्षण आहे.' ते पुढे म्हणाले की, बालविवाह 'आयुष्यभर दुःखास कारणीभूत ठरु शकते.' यातच युनिसेफने म्हटले आहे की, ज्या मुलींचे विवाह 18 वर्षे वयाच्या आधी होतात त्यांची शाळेत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. घरगुती हिंसाचार, भेदभाव, गैरवर्तन आणि खराब मानसिक आरोग्यामुळे अफगाण नागरीकांच्या आजारामध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुली तरुण वयात गरोदर राहतात (Afghanistan Girl Education). बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे मुलींचे जीव धोक्यात आले आहेत. युनिसेफने उपासमार, बालमजुरी आणि बालविवाहाच्या जोखमींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आर्थिक सहाय्य कार्यक्रम सुरु केला आहे, परंतु हे उपाय पुरेसे नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT