Many flights have been stopped after the attack at Hamburg Airport in Germany. Dainik Gomantak
ग्लोबल

Watch Video: जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर गोळीबाराचा थरार, 27 विमानांची उड्डाणे रद्द

Hamburg Airport: रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास एक व्यक्ती हॅम्बर्ग विमानतळाचा सुरक्षा चेक पॉइंट तोडून आपल्या कारसह टर्मिनल वनवर पोहोचला.

Ashutosh Masgaunde

Many flights have been stopped after the attack at Hamburg Airport in Germany:

जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. विमानतळाच्या टर्मिनल वनवर कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले.

यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. मात्र, या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास एक व्यक्ती हॅम्बर्ग विमानतळाचा सुरक्षा चेक पॉइंट तोडून आपल्या कारसह टर्मिनल वनवर पोहोचला.

यानंतर कारमधील व्यक्तीने हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपींनी टर्मिनलवर दोन जळत्या बाटल्याही फेकल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये दोन मुलेही होती. दाव्यानुसार, कारमधील व्यक्ती आपल्याच दोन मुलांना ओलीस ठेवत विमानतळावर पोहोचला होता.

या कारवाईदरम्यान पोलिसांना एक फोन आला. फोनवर महिलेने सांगितले की, तिचा नवरा आपल्या दोन मुलांसह विमानतळाकडे निघाला आहे. पतीने आपल्याच मुलांना ओलीस ठेवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर विमानतळावरील हवाई सेवा बंद करण्यात आली आहे. विमानांची लँडिंग आणि टेकऑफ सेवा सध्या बंद आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली.

दरम्यान, विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 27 उड्डाणे प्रभावित झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT