Man arrested for threatening Mukesh Ambani with ransom of 400 crores:
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. आरोपी तेलंगणाचा रहिवासी असून तो अवघा १९ वर्षांचा आहे. त्याने मुकेश अंबानींना 5 ईमेल पाठवून 400 कोटींची मागणी केली होती.
मुंबईच्या गमदेवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव गणेश रमेश वनपर्धी असे आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शादाब असल्याचे भासवत गणेशने मुकेश अंबानींना 400 कोटी रुपये न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ईमेल युरोपातील बेल्जियम या देशातून पाठवले जात असल्याचे आरोपी भासवत होता. पोलिसांनी पहिल्यांदा ज्या कॉम्प्युटरवरून हे ईमेल पाठवले जात होते, त्या संगणकाचा आयपी एड्रेस पोलिसांनी शोधून काढला.
यानंतर हा कॉम्प्युटर वापरत असलेल्या केंद्रात पोलीस पोहचले, त्याच्या मालकाने सांगितले की, गेल्या 6-7 दिवसांत एक तरुण अनेकदा ईमेल करण्यासाठी आला होता.
पोलिसांनी केंद्रचालकाकडून तरुणाचा पत्ता घेतला आणि घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने सांगितले की, त्याने 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत मुकेश अंबानींना 5 ईमेल पाठवून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
मुकेश अंबानींना पहिला धमकीचा ईमेल 27 ऑक्टोबरला आला होता. यामध्ये 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
यावेळी धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिले होते, "तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत."
28 ऑक्टोबर रोजी अंबानींना आणखी एक ईमेल आला, ज्यामध्ये खंडणीची रक्कम 200 कोटी रुपये करण्यात आली होती.
30 ऑक्टोबरला एक ईमेलही आला होता, ज्यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला देशातील सर्वोत्तम शूटर मारतील, असेही या ईमेलमध्ये म्हटले होते.
27 ऑक्टोबर रोजी पहिला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुंबईच्या गमदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक केली होती.
आरोपींनी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.