A man has been arrested for opening the emergency door of an Asiana Airlines flight as it was landing in South Korea. Dainik Gomantak
ग्लोबल

Plane Emergency Door Open: दोनशे प्रवाशांच्या जीवाशी खेळ; तरुणाने अचानक उघडले इमर्जेंसी डोअर

विमानात बसलेले लोक रडताना आणि ओरडतानाही दिसत आहेत. लहान मुलांच्या किंकाळ्याही ऐकू येत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Asiana Airlines South Korea flight

शुक्रवारी आशियाना एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने अचानक Emergency Door उघडल्याने फ्लाइटमधील 194 प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला. दक्षिण कोरियाच्या डेगू शहरात विमान उतरणार असताना ही घटना घडली. 

जेव्हा विमान हवेत होते, तेव्हा एका प्रवाशाने आपत्कालीन एक्झिट लीव्हर दाबला, ज्यामुळे दरवाजा उघडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो धक्कादायक आहे. लोक आपली जागा घट्ट धरून बसले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विमानात बसलेले लोक रडताना आणि ओरडतानाही दिसले आहेत. लहान मुलांच्या किंकाळ्याही ऐकू येतात. हे विमान दक्षिण कोरियाच्या डेगू शहराला जात होते. ते आशियाना एअरलाइन्सचे होते.

डेगू विमानतळावर विमान उतरताच आपत्कालीन पथक तातडीने तेथे पोहोचले. भीतीमुळे नऊ जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात पाठवावे लागले. या लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी Emergency Door उघडणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ३० वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने Emergency Door का उघडले हे अद्याप कळू शकले नाही.

दक्षिण कोरियाच्या वाहतूक मंत्रालयाचे म्हणणे आहे की, विमानातील काही लोकांनी त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. विमानात एकूण 194 लोक होते. यामध्ये 48 मुले होती जी ओल्सन शहरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होती.

यातील एका खेळाडूच्या आईने सांगितले की, Emergency Door उघडताच मुले रडू लागली आणि ओरडू लागली. दाराच्या शेजारी असलेले लोक भीतीने थरथरू लागले. आशियाना एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, अधिकारी सध्या दरवाजा कसा उघडला याचा तपास करत आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, Emergency Door उघडणाऱ्या व्यक्तीने दरवाजा उघडून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला. फ्लाइट अटेंडंटने पुरुष प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडून आत ओढले.

दुसरीकडे या घटनेवरुन भारतातील लोक युजर्स भाजप खासदार तेजस्वी सूर्याला टॅग करून कमेंट करत आहेत. कारण नुकतेच भाजप खासदार तेजस्वी सूर्यावर विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाचे Emergency Door उघडल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

SCROLL FOR NEXT