New Species In Pacific Ocean: एक, दोन नव्हे तर तब्बल 5000 समुद्री जीवांचा शोध   

DEEP SEA MINING : या प्रजाती पॅसिफिक महासागराच्या अशा भागात आढळून आल्या आहेत, जिथे भविष्यात मोठ्या प्रमाणात खाणकाम होणार आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.
More than 5000 new species have been discovered in an area identified for future DEEP SEA MINING.
More than 5000 new species have been discovered in an area identified for future DEEP SEA MINING.Dainik Gomantak
Published on
Updated on

New Species In Pacific Ocean: शास्त्रज्ञांनी पॅसिफिक महासागरामध्ये 5000 हून अधिक नवीन प्रजातींच्या समुद्री जीवांचा शोध लावला आहे. या प्रजाती पॅसिफिक महासागराच्या अशा भागात आढळून आल्या आहेत, जिथे भविष्यात मोठ्या प्रमाणात खाणकाम होणार आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.

हे क्षेत्र क्लेरियन-क्लिपरटन झोन नावाने ओळखले जाते. ज्याला 'खनिज समृद्ध' मानले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे उपलब्ध आहेत. या भागात समुद्री जीवांच्या नवीन प्रजाती आढळून आल्याने खानकामाचा यावर कोणता परिणाम होईल याचा अभ्यास होणार आहे.

(Scientists discovered more than 5000 new species of marine life in the depths of the Pacific Ocean.) 

अद्वितीय प्रजाती

आतापर्यंत सापडलेले सर्व जीव जीवशास्त्रासाठी पूर्णपणे नवीन आहेत. जवळजवळ हे सर्व प्राणी  पूर्णपणे अद्वितीय आहेत. या 5000 पैकी केवळ 6 प्राणी असे आहेत, जे यापूर्वी इतरत्र पाहिले गेले आहेत. उदाहरणार्थ, कार्निव्होरस स्पोंज आणि सी कुकुंबर (Carnivorous sponge and a Sea cucumber).

इंग्लंड, अमेरिका आणि चीनी कंपन्यांना कंत्राट

आतापर्यंत, एकूण 17 समुद्र खाण कंत्राटदारांना क्लेरियन-क्लिपर्टन झोनमध्ये खाणकामासाठी कंत्राट देण्यात आले आहे. हे सर्व मिळून सुमारे 7 लाख 50 हजार चौरस मैल परिसरात खाणकाम करतील. या खाण कंपन्या इंग्लंड, अमेरिका आणि चीनमधील आहेत. ते या भागातून निकेल, कोबाल्ट आणि मॅंगनीज सारख्या घटकांची खाण करतील आणि त्यांची पर्यायी उर्जेच्या क्षेत्रात विक्री करतील.

शास्त्रज्ञांकडून चेकलिस्ट

एका बाजूला खनिजांचे उत्खनन आणि दुसरीकडे हजारो नवीन सागरी प्रजातींचा शोध. अशा स्थितीत समुद्राच्या खोलवर सुरू असलेल्या खाणकामामुळे या जीवांना कोणता धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंतेची बाब आहे. म्हणूनच अनेक देशांतील काही शास्त्रज्ञांच्या चमूने या क्षेत्राच्या परिसंस्थेवर खाणकामाचा प्रभाव समजून घेण्यासाठी एक चेकलिस्ट बनवली आहे.

करंट बायोलॉजी नावाचे एक जर्नल आहे ज्यामध्ये ही चेकलिस्ट प्रकाशित केली आहे. त्यानुसार सागरी जीवांच्या एकूण 5 हजार 578 नवीन प्रजाती सापडल्या आहेत. ज्यामध्ये जवळपास 92 टक्के असे आहेत जे याआधी पाहिलेले नाहीत.

More than 5000 new species have been discovered in an area identified for future DEEP SEA MINING.
US Capital Riot: यूएस कॅपिटलवर हल्ला !ओथ कीपर्स संस्थापक स्टीवर्ट रोड्सला 18 वर्षांची शिक्षा

जीवांचा शोध कसा लागला?

शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील मोहीम आणि संशोधन क्रूझने समुद्राच्या तळापासून नमुने गोळा करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी रिमोट-नियंत्रित वाहने समुद्रसपाटीपासून 4,000 ते 6,000 मीटर खाली पाठवली. रिसर्च क्रूझ म्हणजे अशी जहाजे जी समुद्राच्या खोलवर संशोधनासाठी वापरली जातात.

या संपूर्ण मोहिमेचा एक भाग असलेले एड्रियन ग्लोव्हर हे या संशोधनाचे ज्येष्ठ लेखक होते. एड्रियन हे NHM मध्ये खोल समुद्रातील जीवशास्त्रज्ञ आहेत आणि भूतकाळात अनेक CCZ मोहिमांचा भाग राहिले आहेत.

Smartex Expedition नावाच्या या मोहिमेला UK च्या Natural Environment Research Council सारख्या अनेक संस्थांनी निधी दिला होता. याशिवाय, यूकेची समुद्र खाण कंपनी यूके सीबेड रिसोर्सेस देखील या मोहिमेचा एक भाग आहे. रिमोटवर चालणारी वाहने जी समुद्राच्या तळाशी पाठवली गेली. त्यांच्याद्वारे नवीन जीव गोळा केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com