Zahid Rameez And PM Modi 
ग्लोबल

'आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक', मोदींच्या लक्षद्वीप भेटीवर मालदीवच्या सत्ताधारी नेत्याची खोचक टीप्पणी

झाहिद रमीझ यांच्या या टिप्पणीनंतर संतप्त नेटिझन्सनी पर्यटनासाठी मालदीवमध्ये न जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

Pramod Yadav

Maldives Zahid Rameez: मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टी (PPM) चे कौन्सिल सदस्य झाहिद रमीझ यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट 'एक्स'वर भारतीयांची खिल्ली उडवत, वर्णद्वेषी टिप्पणी केली. तसेच, मालदीवशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक असल्याचे रमीझ यांनी म्हटले आहे.

एक्स युझर मिस्टर सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे शेअर केलेल्या पोस्टवर झाहिद रमीझ यांनी रिप्लाय दिला आहे.

झाहिद रमीझ यांच्या या टिप्पणीनंतर संतप्त नेटिझन्सनी पर्यटनासाठी मालदीवमध्ये न जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींच्या अलीकडील लक्षद्वीप भेटीचा फोटो शेअर केला. छायाचित्रात, पंतप्रधान निसर्गरम्य बेटाच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना दिसत आहेत. मोदींच्या भेटीमुळे लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना मिळेल, असे सिन्हा या ट्विटमध्ये म्हटले आहे.

"छान पाऊल आहे. पण, आपल्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? खोल्यांमध्ये सतत येणारा वास ही सर्वात मोठी अडचण असेल." असे ट्विट झाहिद रमीझ श्री सिन्हा यांच्या पोस्टला उत्तर देताना केले आहे.

आता एक वर्षानंतर पर्यटकांच्या संख्येचा आकडा तपासा, तुम्हाला मालदीवलाही मागे टाकणारी वाढ दिसेल, असे आणखी एक युझरने लिहले आहे.

रमीझ यांच्या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या वर्णद्वेषी विधानावर संताप व्यक्त केला. अनेकांनी मालदीववर बहिष्कार टाकत पर्यटनासाठी लक्षद्वीपला पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

हिंदूहेटच्या पोस्टला प्रतिसाद देताना संदीप नील या व्यक्तीने झाहिद रमीझने अलीकडेच भारतीय नागरिकत्व मागितले होते याचा स्क्रीनशॉट शेअर केला.

28 जून 2023 रोजी, त्यांनी मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांना टॅग केले होते आणि त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची विनंती केली होती, या पोस्टचा पुराव्यासह ट्विट शेअर केले आहे.

रमीझ यांच्या वर्णद्वेषी टिप्पणीविरोधात संताप व्यक्त केल्यानंतर, 'मुस्लिम' असल्याने त्यांना टार्गेट केलं जात असल्याचे म्हटले आहे.

माझा जन्म भारतात झाला. मी कायदा निर्माता नाही. मी ट्विटद्वारे माझे विचार मांडतो. प्रतिक्रियेबाबत एवढा संताप का आहे? आमच्याबद्दल, मुस्लिमांबद्दल आणि पॅलेस्टाईनबद्दल अधिक उग्र टिप्पण्या केल्या जातात. तरी, मी सहसा टिप्पणी करत नाही, असे रमीझ यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 आणि 3 जानेवारी रोजी लक्षद्वीपला भेट दिली, त्यांच्या दक्षिण भारत दौऱ्याचा एक भाग म्हणून ज्यात तमिळनाडू आणि केरळमधील कार्यक्रमांचाही समावेश होता.

मंगळवार, 2 जानेवारी रोजी पंतप्रधान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पोहोचले, तेथून ते त्याच दिवशी लक्षद्वीपमधील अगाट्टी येथे गेले. 3 जानेवारी रोजी रोड शोसाठी केरळला जाण्यापूर्वी त्यांनी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये रात्र घालवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT