Maldives Former President Ibrahim Mohamed Solih Dainik Gomantak
ग्लोबल

India-Maldivs Relations: ''हट्टीपणा सोडा अन् भारताशी बोला''; मालदीवच्या माजी राष्ट्राध्याक्षांनी चीन समर्थक मुइज्जूला दिला घरचा आहेर

Maldives Former President Ibrahim Mohamed Solih: भारत आणि शेजारी देश मालदीव यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. मालदीव सातत्याने भारतावर गंभीर आरोप करत आहे.

Manish Jadhav

India-Maldivs Relations:

भारत आणि शेजारी देश मालदीव यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. मालदीव सातत्याने भारतावर गंभीर आरोप करत आहे. यातच आता, चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे मालदीवची आर्थिक स्थिती आता बिकट होत चालली आहे. मालदीववर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. विशेष म्हणजे, मुइज्जू यांना यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये.

दरम्यान, मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुइज्जू यांचे पूर्ववर्ती मोहम्मद सोलिह यांनी म्हटले आहे की, 'मुइज्जू यांनी आपली हट्टी वृत्ती सोडून शेजाऱ्यांशी चर्चा करुन मालदीवची आर्थिक समस्या सोडवावी.' यावेळी बोलताना सोलिह यांचा थेट इशारा भारताकडे होता. विशेष म्हणजे, सोलिह यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा मोहम्मद मुइज्जू यांनी एक दिवस आधी कर्जाची परतफेड करण्यावरुन भारताकडे दिलासा देण्याची विनंती केली होती.

दुसरीकडे, माले येथे शनिवारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) च्या रॅलीला संबोधित करताना, इब्राहिम मोहम्मद सोलिह म्हणाले की, त्यांनी मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत की मुइज्जू कर्ज सवलतीसाठी चर्चा करत आहेत. मालदीव मीडिया आउटलेट अधाधूने हे वृत्त दिले. मूइज्जू यापूर्वी म्हणाले होते की, कर्ज परतफेडीच्या प्रकरणावर भारताशी बोलू इच्छितो, परंतु आर्थिक समस्या भारताच्या कर्जामुळे नाही.

हट्टी वृत्ती सोडावी लागेल - सोलिह

माजी राष्ट्राध्यक्ष सोलिह पुढे म्हणाले की, 'मालदीववर चीनचे 18 अब्ज मालदीव रुपयांचे कर्ज आहे, तर त्या तुलनेत भारताकडून केवळ 8 अब्ज रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे, ज्याची परतफेड करण्यासाठी 25 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.' सोलिह पुढे असेही म्हणाले की, ''मला विश्वास आहे की आमचे शेजारी मदत करतील, परंतु आपण आपली हट्टी वृत्ती सोडली पाहिजे. आपल्याला मदत करणारे बरेच सहयोगी आहेत, पण ते (मुइज्जू) तडजोड करायला तयार नाहीत, परंतु मला वाटते आता त्यांना परिस्थिती समजू लागली आहे.''

मोहम्मद सोलिह यांनी उपहासात्मकपणे सांगितले की, 'शेजारी आणि मध्य पूर्व इस्लामिक देश मालदीवला मदत करतील, परंतु आमच्या सध्याच्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे आम्हाला मध्यपूर्वेतून आतापर्यंत फक्त 50 टन खजूर मिळाले आहेत.' तुर्कस्तानशी संबंध वाढवणे आणि एर्दोगानला खलीफा म्हणणे या मूइज्जू यांच्या पावलांचा उल्लेख सोलीह करत होते, ज्यामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांना नक्कीच राग येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT