India Maldives Tension: चीननंतर मालदीवचा 'या' इस्लामिक देशाबरोबर मैत्रीचा घाट; भारताविरुद्ध खेळली नवी चाल

Maldivian President Mohamed Muizzu: भारतासोबतच्या तणावाच्या काळात मालदीव हळूहळू आपल्या मैत्रीची व्याप्ती वाढवत आहे.
Maldivian President Mohamed Muizzu
Maldivian President Mohamed MuizzuDainik Gomantak
Published on
Updated on

India Maldives Tension: भारतासोबतच्या तणावाच्या काळात मालदीव हळूहळू आपल्या मैत्रीची व्याप्ती वाढवत आहे. चीनसोबत संरक्षण करार केल्यानंतर मुइज्जू यांनी इस्लामिक देश तुर्कीसोबत नवा करार केला आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी तुर्कीसोबतच्या नव्या करारात प्रथमच लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मालदीवचा हा करार भारतीय सैन्याच्या माघारीपूर्वी झाला आहे. मालदीवमधील भारतीय सैनिक 10 मे पर्यंत भारतात परततील. यापूर्वी मुइज्जू यांनी भारतीय सीमेवर पाळत ठेवण्यासाठी लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. पुढील आठवड्यापासून मालदीव हे ड्रोन वापरण्यास सुरुवात करणार असल्याचेही वृत्त आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनकडून प्राणघातक शस्त्रे घेण्याच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही दिवसांतच मालदीवने हिंदी महासागरातील आपल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गस्त घालण्यासाठी तुर्कीकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन खरेदी केले आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की, खरेदी केलेल्या ड्रोनची नेमकी संख्या स्पष्ट नाही किंवा मालदीव संरक्षण मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Maldivian President Mohamed Muizzu
India Maldives Tension: चीनच्या कुशीत खेळणाऱ्या मालदीवने भारतीयांविरुद्ध उचलले मोठे पाऊल; तणाव आणखी वाढणार!

लष्करी ड्रोन प्रथमच मालदीवमध्ये पोहोचले आहेत

दरम्यान, शी जिनपिंग यांच्याशी निकटवर्तीय असलेले मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनहून परतल्यावर असे संकेत दिले होते की, त्यांचे सरकार हिंद महासागरातील आपल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गस्त घालण्यासाठी ड्रोन घेण्याचा विचार करत आहे. याच पाश्वभूमीवर सध्याच्या मालदीव सरकारने गस्त घालण्यासाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी तुर्की कंपनीशी करार केला. मालदीव पहिल्यांदाच या भागात ड्रोनचा वापर करत आहे. 3 मार्च रोजी हे ड्रोन मालदीवला देण्यात आले.

मालदीवच्या न्यूज पोर्टल अधाधुने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देऊन सांगितले की, ड्रोन सध्या नूनू माफारु आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मुइज्जू यांनी पहिल्यांदाच तुर्कीला भेट दिली. अहवालात असे म्हटले आहे की, अलीकडेच पत्रकार परिषदेत मालदीव सरकारला विचारण्यात आले की सरकार असे ड्रोन वापरु शकते का? "पण संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने थेट भाष्य करण्यास नकार दिला आणि सांगितले की संरक्षणासाठी हे आवश्यक आहे," असे न्यूज पोर्टलने म्हटले.

Maldivian President Mohamed Muizzu
India Maldives: मालदीवचे विरोधी पक्ष शिकवणार मुइझ्झू यांना धडा, अध्यक्षांच्या अभिभाषणावर टाकणार बहिष्कार

ही भारताविरुद्धची नवी चाल खेळळी आहे का?

जानेवारीमध्ये, चीनच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलत असताना, मुइज्जू यांनी भारताचे नाव न घेता त्यांच्या देशाच्या संरक्षणाबद्दल अनेक दावे केले. मालदीव कोणत्याही देशाच्या मदतीवर अवलंबून नाही, असे प्रतिपादन करुन मुइजू म्हणाले की, “आमचा देश जरी लहान असला, तरी आम्ही नऊ लाख चौरस किलोमीटरचा स्पेशल इकॉनॉमिक झोन असलेला एक मोठा देश आहोत. मालदीव हा हिंद महासागराचा सर्वात मोठा भाग असलेला देश आहे. हा महासागर कोणत्याही विशिष्ट देशाची मालमत्ता नाही.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com