Power Outage In Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Power Outage In Pakistan: पाकिस्तान अंधारात! मेट्रो, बाजारपेठा ठप्प; सरकारने केली लोकांना 'ही' विनंती

पाकिस्तान सरकार आधीच आर्थिक संकटात असल्यामुळे देशाची स्थिती बिकट आहे. दरम्यान, आता वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांनी रोष व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

पाकिस्तानची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता विजेचे संकट अधिक गडद झाले आहे. राजधानी इस्लामाबादबरोबरच लाहोर आणि कराचीमध्येही मागील अनेक तासांपासून वीज पुरवठा खंडित (Power Outage In Pakistan) झाला आहे. वीज संकटामुळे सरकारने अनेक भागातील मॉल्स, मुख्य बाजारपेठा वेळेपूर्वी बंद करण्याची विनंती केली आहे.

पाकिस्तान सरकार आधीच आर्थिक संकटात असल्यामुळे देशाची स्थिती बिकट आहे. दरम्यान, आता वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांनी रोष व्यक्त केला आहे. तर, सरकारने देशातील नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

(Major power outage in Pakistan, significant parts of Islamabad, Lahore and Karachi without power for hours)

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 7:34 वाजता राष्ट्रीय ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी कमी झाली, ज्यामुळे वीज यंत्रणेत मोठा बिघाड झाला आहे. यंत्रणा देखभालीचे काम वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा आणि गुड्डू दरम्यानच्या हाय-टेंशन ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे देशाच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पाकिस्तानला आधीच वीज टंचाई आणि वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. असे पाकिस्तान सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, वीज नसल्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या संतापाचा भडका उडला आहे. अनेक तासांपासून वीज लाईन ठप्प आहे. गुड्डू, जामशोरो, मुझफ्फरगड, हवेली शाह बहादूर, बलोकी येथील पॉवर प्लांटमध्ये वीज बिघाड झाल्यामुळे वीज गेल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. लाहोरमध्ये, मॉल रोड, कॅनाल रोल्ड आणि इतर भागातील ग्राहकांना वीज पुरवठ्यात व्यत्यय येत आहे, तर ऑरेंज लाइन मेट्रो ट्रेन सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

इस्लामाबाद विद्युत पुरवठा कंपनीच्या 117 ग्रिड स्टेशनचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे, याचा राजधानी कराची आणि रावळपिंडीच्या (Karachi And Rawalpindi) विविध भागांवर परिणाम झाला आहे, पाकिस्तान न्यूज वेबसाइटनुसार. कराचीतील गुलिस्तान-ए-जौहर, पहलवान गोठ, जौहर मोड, भिताबाद, नाझिमाबाद, गोलीमार आणि इतर भागात वीज नाही. देशभरातील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही तास लागू शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT