Monterey Park: कॅलिफोर्नियामध्ये चिनी नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार, 9 ठार

चिनी नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे.
Monterey Park shooting
Monterey Park shootingGomantak Digital
Published on
Updated on

Monterey Park shooting

अमेरिकेत सामूहिक गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहराजवळील मॉन्टेरी पार्कमध्ये ही घटना घडली. चिनी नववर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे.

या घटनेत 16 जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकन मीडियाने या घटनेचे विस्तृत वार्तांकन केले असून त्यात 9 लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Monterey Park shooting
America Air Strike: अमेरिकेने केला अजून एक एअर स्ट्राइक, 30 दहशतवादी मारल्याचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहाच्या दरम्यान ही घटना घडली. मॉन्टेरी पार्कमध्ये अनेक लोक चिनी नववर्ष साजरे करण्यासाठी जमले होते. कार्यक्रमाचा आनंद घेत असताना, एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला.

या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. आणि हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेत 9 जण ठार झाले असून त्यापैकी अनेक जखमींचा बळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Mass shooting at Chinese New Year festival in Los Angeles)

Monterey Park shooting
Khalistani Conspiracy: सोशल मीडिया बनले हत्यार, PAK च्या मदतीने खलिस्तान्यांनी रचला भारताविरुध्द कट

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कॅलिफोर्नियातील गोशेन येथे 5-6 दिवसांपूर्वी एक घटना घडली होती, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एका सहा महिन्यांच्या बाळालाही गोळी लागल्याने जीव गमवावा लागला. गोशेन येथील घटना दोन जणांनी घडवून आणली होती, मात्र आजतागायत ते पोलिसांना अटक करता आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com