Rishi Sunak: व्हिडीओ बनवणं सुनक यांना पडलं भारी, 'सीट बेल्ट लावयला शिकवा...'

UK News: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी व्हिडीओ बनवण्यासाठी गाडी चालवताना सीट बेल्ट काढल्याबद्दल माफी मागितली आहे.
Rishi Sunak
Rishi SunakDainik Gomantak
Published on
Updated on

Seat Belt Fine on Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी व्हिडीओ बनवण्यासाठी गाडी चालवताना सीट बेल्ट काढल्याबद्दल माफी मागितली आहे. त्याचवेळी, स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.

लँकेशायर पोलिसांनी (Police) सांगितले की, व्हिडीओ बनवण्यासाठी उत्तर-पश्चिम इंग्लंडमध्ये गाडी चालवत असताना सुनक यांनी सीटबेल्ट काढल्याबद्दल माफी मागितल्यानंतर गुरुवारी या प्रकरणाविषयी माहिती झाले. पोलिसांकडून ते दोषी आढळल्यास त्यांना 100 ब्रिटिश पाउंडचा दंड होऊ शकतो.

Rishi Sunak
Rishi Sunak भडकले, PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरुन ब्रिटिश संसदेत गदारोळ

ब्रिटनमध्ये सीटबेल्ट न लावल्यास हा दंड आहे

सुनक यांच्या 'डाऊनिंग स्ट्रीट' (पंतप्रधान कार्यालय) प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की, 'त्यांनी फक्त तात्पुरता सीट बेल्ट काढला होता, मात्र त्यांनी ही चूक मान्य केली आहे.' £100 चा तात्काळ दंड आहे. प्रकरण न्यायालयात (Court) गेल्यास, हा दंड £500 पर्यंत वाढतो. वैध वैद्यकीय कारणांमुळे, 'सीट बेल्ट' घालण्यापासून अनेक वेळा सूट दिली जाते.'

कार्यालयाने किरकोळ चूक सांगितली

सुनक यांच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, 'त्यांच्या निर्णयात ही एक छोटीशी चूक होती. छोटा व्हिडीओ बनवण्यासाठी पंतप्रधानांनी सीट बेल्ट काढला होता. त्यांनी आपली चूक पूर्णपणे स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी माफीही मागितली आहे.'

Rishi Sunak
'एक रहो या मरो', Rishi Sunak यांनी पंतप्रधान होताच पक्षाच्या खासदारांना दिला हा संदेश

प्रवक्त्याने पुढे असेही सांगितले की, 'पंतप्रधानांचे असे मत आहे की, प्रत्येकाने सीट बेल्ट लावला पाहिजे.' देशभरातील 100 हून अधिक प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्यासाठी 'लेव्हलिंग अप फंड' ची घोषणा करण्यासाठी सुनक यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडीओमध्ये मोटारसायकलवरील पोलिस कर्मचारी त्यांच्या कारभोवती दिसत आहेत.'

Rishi Sunak
Rishi Sunak: पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचे पहिले भाषण, 'ब्रिटनच्या लोकांसाठी...'

दुसरीकडे, सुनक यांच्यावर निशाणा साधत विरोधी मजूर पक्षाचे प्रवक्ते म्हणाले की, “ऋषी सुनक यांना सीट बेल्ट कसे लावायचे, डेबिट कार्ड कसे वापरायचे, ट्रेन सेवा कशी चालवायची, या देशातील अर्थव्यवस्था कशी सांभाळायची हे माहीत नाही. दिवसेंदिवस ही यादी लांबत चालली आहे आणि ती पाहून खूप वाईट वाटते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Gigh Speed Internet Connectivity
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Goa Water Metro
viresh borkar On RGP Internal Dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com