Mahatma Gandhi's statue vandalised in Australia
Mahatma Gandhi's statue vandalised in Australia Dainik Gomantak
ग्लोबल

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

दैनिक गोमन्तक

भारत सरकारने (Indian Government) भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) कांस्य पुतळ्याची ऑस्ट्रेलियात (Australia) तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Prime Minister Scott Morrison ) यांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करत ही बाब लाजिरवाणी असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायात निराशा पसरली आहे.एका स्थानिक वृत्त पत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात भारताचे महावाणिज्यदूत श्री राजकुमार आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसमवेत रॉविल येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये पुतळ्याचे अनावरण केले आणि त्याच्या काही तासांनंतरच ही घटना घडली आहे .(Mahatma Gandhi's statue vandalised in Australia)

याघटनेबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान 'अनादरपणाचे हे कृत्य लाजिरवाणे असून देशातील सांस्कृतिक स्मारकांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत' असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर या कृत्याला जो कोणी जबाबदार असेल त्याने ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाचा अपमान केला आहे आणि त्यांना वाटली पाहिजे.अशा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला आहे.

या घटनेबाबत बोलताना व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 5:30 ते शनिवारी संध्याकाळी 5:30 दरम्यान अज्ञात गुन्हेगारांनी पुतळा तोडण्यासाठी पॉवर टूल्सचा वापर केला असून पोलिसांनी सांगितले की, नॉक्स क्राइम इन्व्हेस्टिगेशन युनिटचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि घटनेच्या साक्षीदारांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन देखील केले जात आहे . या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, शहरातील भारतीय समुदायाने याला "निम्न पातळीचे कृत्य" म्हटले आहे.

स्थानिक वृत्त संस्थेच्या एका बातमीनुसार 'फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन ऑफ व्हिक्टोरिया'चे अध्यक्ष सूर्य प्रकाश सोनी यांचा हवाला देत आपल्या बातमीत म्हटले आहे की, 'समुदायाला खूप धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. मला समजत नाही की कोणी असे घृणास्पद कृत्य का करेल.' ते म्हणाले की रोव्हिल सेंटर हे व्हिक्टोरिया राज्यातील पहिले भारतीय कम्युनिटी सेंटर आहे आणि 30 वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याची स्थापना झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT