अमेरिकेच्या शाळांमध्ये घडत आहे 'ही' लाजिरवाणी गोष्ट!

शाळेमधील चार भिंतींच्या आड घडत असलेला प्रकार ऐकून व्हाल थक्क!
Hazarad High School
Hazarad High School Dainik Gomantak

'विद्येच्या' चौकटींमध्ये ज्ञानाचा 'सागर' असायला हवा तिथे विद्यार्थांवरती नको त्या गोष्टींची सावली पडत आहे. शाळेतील शिक्षक मुलांना अश्लील लॅप डान्स (Obscene Lap Dance in School) करायला लावतात आणि नंतर सोशल मीडियावरती फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल (Viral) करत असल्याचे समोर आले आहे. शाळा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. चौकशी समितीसमोर काही सत्यता मांडल्यास शाळेचे शिक्षक (School teacher) व मुख्याध्यापक (Headmaster) त्यांचे नंतर नुकसान करू शकतात, असेही समोर आले आहे.

तुम्ही कधी असे शिक्षा मंदिर ऐकले आहे का, जिथे शिक्षक आणि शिक्षिका स्वतः विद्यार्थ्यांसोबत अश्लील लॅप डान्स करतात. ही बातमी धक्कादायक आणि अविश्वसनीय वाटू शकते. पण ती तितकीच खरी आहे इतकंच नाही तर ज्या शाळेत ही लाजिरवाणी घटना घडली, तेथील आरोपी आणि निर्भीड मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांनी मुलांच्या या अश्लील लॅप डान्सचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले.

Hazarad High School
चिनी अधिकाऱ्याची अमेरिका,ऑस्ट्रेलियाला 'महायुद्धा'ची धमकी

खरे तर या अश्लील घटनेवर जगातील महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिका सारख्या देशात लहान मुलांची ही आक्षेपार्ह फोटोज सोशल मीडियावर (फेसबुक) व्हायरल झाल्याने एकच गोंधळ उडाला. वास्तविक ही घटना काही दिवसांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०२१ च्या अखेरीस चर्चेत आली होती. अमेरिकेतील एका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आणि शाळेच्या शिक्षकांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांसोबत अश्लील लॅप डान्स केल्याची ही लाजिरवाणी घटना घडली आहे.

विद्यार्थ्यांचे फोटोज मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांनी फेसबुकवर अपलोडही केलस होते. फेसबुकवर अपलोड करण्यात आलेल्या मुलांची ही आक्षेपार्ह छायाचित्रे पाहून अमेरिकेत खळबळ उडाली होती. पीडित शाळकरी मुलांच्या कुटुंबियांसह देशातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रसारमाध्यमे आणि जाणकारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली, प्रकरण वाढत असल्याचे पाहून शिक्षकांनी फेसबुकवर व्हायरल झालेली छायाचित्रे तत्काळ डिलीट केली. मात्र, ती छायाचित्रे हटवण्यापूर्वीच देशातील अनेकांनी त्या छायाचित्रांचे स्क्रीन शॉट्स घेतले होते.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार ही घटना केंटकी (Kentucky) अमेरिकेतील हॅझार्ड हायस्कूल (Hazarad High School) मध्ये झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षकांवर आरोप आहे की, त्यांनी आधी शाळेतील काही मुलांना कामुक कपडे घातले. त्यानंतर शिक्षकांनी मुलांसोबत लॅप डान्स केला. व्हिडिओमध्ये शिक्षक आणि मुले एकत्र लॅप डान्स करताना दिसून येत आहेत. अश्‍लील डान्सच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, शाळेतील शिक्षक निर्लज्जपणे मुलांसोबत लॅप डान्स करण्यात व्यस्त आहेत.

या घटनेचा पर्दाफाश झाल्यावर शिक्षण जगताला लाजवेल अशी ही घटना घडवून आणल्याचा आरोप असलेल्या काही शिक्षकांनी विद्यार्थिनींसोबत अश्लील लॅप डान्सचे फोटोही शाळेच्या फेसबुक पेजवर अपलोड केले. देशभरात खळबळ माजवणाऱ्या या काही चित्रांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक डोनाल्ड मोब्लिनी दिसून येत आहेत. यातून केवळ शिक्षकच नाही तर शाळेचे मुख्याध्यापकही या घृणास्पद कृत्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलांचे असे फोटो सोशल मीडियावर (social media) व्हायरल होताच अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

Hazarad High School
चीनमध्ये डेल्टाचा कहर 1500 विद्यार्थ्यांना केले डालियन शहरात 'कैद'!

देशातील बुद्धिजीवी वर्ग आणि समाजातील इतर सर्व घटकांतील लोकांनीही शाळा आणि तेथील शिक्षक-मुख्याध्यापकांवर कठोर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिक्षकांनी शाळेच्या फेसबुक पेजवर व्हायरल झालेली ही छायाचित्रे तात्काळ डिलीट केली. मात्र, छायाचित्रे हटवल्याने काही फायदा झाला नाही. कारण तोपर्यंत जगभरातील अनेकांनी ती छायाचित्रांचे स्क्रीनशॉट काढले होते. परंतु हॅझार्ड हायस्कूलमधील मुलांसोबत अशी लाजीरवाणी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही.

याआधीही शाळेच्या मुख्याध्यापकांवर सर्व प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रिन्सिपल डोनाल्ड विद्यार्थ्यांसमोर दारू आणि सिगारेट प्यायचे, असा देखील आरोप होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com