Quran Āyah 
ग्लोबल

कुराणचा आयत सांगता न मौलवीने मारली 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या थोबाडीत, सहा तास करावी लागली शस्त्रक्रिया

विद्यार्थ्याच्या डोळ्याचा कॉर्निया खराब झाला असून, त्यावर इलाज करण्यासाठी सहा महिन्यांनंतर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

कुराणचा आयत (Quran Āyah) सांगता न आल्याने हाँगकाँगमधील मदरशातील एका मौलवीने विद्यार्थ्याला निर्दयीपणे थप्पड मारली. यात विद्यार्थ्याच्या डोळ्याला इजा झाली असून, बुधवारी 13 वर्षीय या विद्यार्थ्याच्या डोळ्याची पहिली शस्त्रक्रिया केली, या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना सहा तास लागले.

विद्यार्थ्याच्या डोळ्याचा कॉर्निया खराब झाला असून, त्यावर इलाज करण्यासाठी सहा महिन्यांनंतर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर हाँगकाँगच्या मुस्लिम कौन्सिलने मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि विद्यार्थ्यांबाबत गैरवर्तन रोखण्यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.

इस्लामिक संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. यानंतर गुरुवारी रात्री अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणाची माहिती पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.

विद्यार्थ्याला कुराणातील एकही आयत सांगता येत नव्हता, त्यामुळे संतप्त मौलवीने त्याला जोरात चापट मारली की त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेतून मुस्लिम समुदाय चांगला धडा घेईल आणि यापुढे कोणत्याही प्रकारचे बाल शोषण रोखण्यासाठी परिषद कठोर भूमिका घेईल. अशा घटना रोखण्यासाठी पाच दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार असल्याचे परिषदेने म्हटले आहे. इस्लामिक कौन्सिलने याबाबत सोशल मीडिया पोस्ट प्रसिद्ध केली आहे.

मौलवींना अशा विषयांबाबत प्रशिक्षण दिले जाईल. मौलवी आचारसंहितेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील. 'मुलांचे संरक्षण, पालकांना खात्री व्हावी आणि मदरशांच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी मदरशांमध्ये कॅमेरे बसवले जातील.' असे परिषदेने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT