Sheikh Moeez Mujahid  Dainik Gomantak
ग्लोबल

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

LeT terrorist commander Sheikh Moeez Mujahid shot dead: याप्रकरणी शेख मोईज मुजाहिद याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक फोटो देखील समोर आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पाकिस्तान: लष्कर - ए - तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिद याची त्याच्या घराच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अज्ञातांनी त्याच्या कसूर येथील घराबाहेर गोळ्या घालून त्याला ठार केल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.

शेख मोईज मुजाहिद हा लष्कर - ए - तैयबाचा खुंखार दहशतवादी असून, तो तैयबाचा प्रमुख २६/११ चा मास्टरमाईंड हाफिज सईद याचा खास माणूस असल्याचे देखील सांगितले जाते. शेख मोईजची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर शेख मोईजच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.

याप्रकरणी शेख मोईज मुजाहिद याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक फोटो देखील समोर आला आहे. हा फोटो त्याचाच असल्याचा दावा केला जात आहे. तसेच, त्याच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

याप्रकरणी समोर आलेल्या व्हिडिओत शेख मोईजवर गोळीबार केल्याचा आवाज येत आहे. शेखच्या हत्येची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. किंवा कोणत्याही पाकिस्तानी तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून याची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी अनोळखी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात त्याचा खात्मा झाल्याचा दावा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi: 'वानखेडे'वर मेस्सीचा 'जयघोष', क्रिकेटच्या देवाने फुटबॉलच्या जादूगाराला दिली खास भेट Watch Video

Goa News Live: कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Margao: ...तर मडगाव बकाल दिसले नसते! विकासकामांसाठी निधीचा व्यवस्थित वापर न झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

Hardik Pandya Record: हार्दिक पंड्याचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'! 'अशी' कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Bicholim Market: डिचोलीत बाजारपेठेला लाभला नक्षत्रांचा साज, नाताळाची लगबग; ख्रिसमससाठी खरेदी जोरात

SCROLL FOR NEXT