Om Birla Abuse: लोकसभा अध्यक्षांच्या दालनात घुसून शिवीगाळ! किरेन रिजीजूंचा काँग्रेस खासदारांवर खळबळजनक आरोप

Congress MPs Misconduct: 20 ते 25 काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
Om Birla Abuse
Om Birla AbuseDainik Gomantak
Published on
Updated on

Om Birla Abuse Case: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला असून केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी काँग्रेस खासदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी (11 फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना रिजीजू यांनी खळबळजनक दावा केला की, 20 ते 25 काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेवेळी आपण स्वतः तिथे उपस्थित होतो, असे सांगत रिजीजू यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला.

रिजीजू यांच्या मते, लोकसभा अध्यक्ष हे अत्यंत मृदू स्वभावाचे व्यक्ती आहेत, अन्यथा या खासदारांवर आतापर्यंत कठोर कारवाई झाली असती. विशेष म्हणजे, या गोंधळाच्या वेळी प्रियांका गांधी वाड्रा आणि के. सी. वेणुगोपाल यांसारखे ज्येष्ठ काँग्रेस नेते तिथे उपस्थित होते आणि ते या खासदारांना गोंधळ घालण्यासाठी चिथावणी देत होते, असा आरोपही त्यांनी केला.

Om Birla Abuse
Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

रिजीजू यांनी केवळ दालनातील गैरवर्तनाचाच उल्लेख केला नाही, तर संसदेच्या नियमावलीला पायदळी तुडवल्याचा दावाही केला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपण कोणाच्याही परवानगीशिवाय बोलणार असल्याचे जाहीर केले असून, ते नियमांचे उल्लंघन करत आहेत. संसदेत पंतप्रधान असोत वा सामान्य खासदार, प्रत्येकाला सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच बोलावे लागते, हा संकेत राहुल गांधी नाकारत असल्याचे रिजीजू म्हणाले.

दुसरीकडे, विरोधी पक्षांनी मंगळवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरुन हटवण्यासाठी नोटीस दिली. विरोधकांच्या आरोपानुसार, अध्यक्ष हे पक्षपातीपणे वागत असून जोपर्यंत या नोटीसवर निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांनी कामकाजाचे अध्यक्षपद भूषवू नये. काँग्रेस खासदारांच्या विरोधात अध्यक्षांनी केलेल्या दाव्यांनाही विरोधकांनी 'खोटे' ठरवले.

Om Birla Abuse
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

त्याचवेळी, भाजपने (BJP) विरोधकांच्या या हालचालीवर कडाडून टीका केली असून, हा संसदीय संस्थांना कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. 4 फेब्रुवारी रोजी संसदेत जे काही घडले, त्याचे व्हिडिओ फुटेज रिजीजू यांनी प्रसिद्ध केले, ज्यामध्ये विरोधी पक्षाच्या महिला खासदार सत्ताधारी बाकांकडे चालून जाताना दिसत आहेत. जर भाजप खासदारांना रोखले नसते, तर परिस्थिती अधिक स्फोटक झाली असती, असे रिजीजू यांचे म्हणणे आहे.

Om Birla Abuse
PM Modi Celebrates Diwali: भर समुद्रात देशभक्तीचा उत्‍साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी नौदलाच्‍या जवानांसमवेत

माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या 'अप्रकाशित' आठवणींवरुन राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखल्यापासून संसदेत हा गोंधळ सुरु झाला. या गदारोळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर उत्तर देता आले नाही आणि ऐतिहासिकदृष्ट्या पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. एकूणच, सध्या संसदेचे कामकाज हे लोकशाहीच्या चर्चेऐवजी आरोप-प्रत्यारोपांच्या आखाड्यासारखे बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com