Borim: बंदूक साफ करायला गेला, अचानक दाबला गेला ट्रिगर; गोळी लागून बोरीतील व्यक्ती गंभीर जखमी

Borim Gun Fire Incident: घरात ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची काळजीपूर्वक हाताळणी करावी आणि योग्य सुरक्षितता उपायांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Borim Gun Fire Incident
Borim Gun Fire IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी परिसरात जुनी बंदूक साफ करताना घडलेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. तिशे–बोरी येथील पंकज प्रभाकर नाईक (वय ४१) हे घरातील जुनी बंदूक स्वच्छ करण्याचे काम करत होते. यावेळी अनवधानाने बंदुकीचा ट्रिगर दाबला गेल्याने अचानक गोळी सुटली आणि ती त्यांच्या पायात घुसली.

घटनेनंतर घरात एकच गोंधळ उडाला. गोळी लागल्यामुळे पंकज यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी फोंडा आयडी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे हलविण्यात आले.

Borim Gun Fire Incident
Podshe Gunshot: 'मद्यपींना घाबरवण्यासाठी' गोळीबार! सत्तरीचे गूढ उकलले, आरोपीच्या घरातून Air Gun जप्त

या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून सोमवारी फोंडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. बंदूक परवानाधारक होती का, तसेच ती कार्यरत अवस्थेत का ठेवण्यात आली होती, याबाबतही चौकशी केली जात आहे.

Borim Gun Fire Incident
Naibag Gunshot : "आम्हाला गँग्स ऑफ गोवा'ची भीती!" नायबाग येथे गोळीबार, 2 कामगार गंभीर जखमी; LOP यांचा सरकारवर निशाणा

दरम्यान, पंकज नाईक यांची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घरात ठेवलेल्या शस्त्रास्त्रांची काळजीपूर्वक हाताळणी करावी आणि योग्य सुरक्षितता उपायांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com