King Charles  Dainik Gomantak
ग्लोबल

UN Climate Summit मध्ये भारतातील पुराचा ब्रिटिश राजे चार्ल्स यांनी उपस्थित केला मुद्दा; म्हणाले...

UN Climate Summit: ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत भारतातील पूरस्थितीचा उल्लेख केला.

Manish Jadhav

UN Climate Summit: ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी दुबईत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत भारतातील पूरस्थितीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'गोष्टी वेगाने बदलत आहेत. वेगाने बदलणारे वातावरण सुधारण्यासाठी काही केले नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.' COP28 UN क्लायमेट समिटला संबोधित करताना राजे चार्ल्स यांनी जागतिक नेत्यांना सांगितले की, 'बदलत्या हवामानाचे संकट आता आपल्यासमोर उभे ठाकले आहे आणि त्याचे धोके नाकारता येणार नाहीत.'

ते पुढे म्हणाले की, ''मी मनापासून प्रार्थना करतो की या शिखर परिषदेत असे एकमत होईल की आपण हवामान बदलाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी काही पावले उचलू शकू. निसर्ग आपल्याला कसा इशारा देत आहे हे आपण आधीच पाहत आहोत.'' किंग चार्ल्स हे ब्रिटीश सरकारचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत सहभागी होत आहेत. यूएईमधून त्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. ते पुढे म्हणाले की, 'हे संकट टाळण्यासाठी आपण सरकारांशिवाय खाजगी संस्थांनाही सोबत घेऊ शकतो. याशिवाय, विमा क्षेत्रही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. एवढेच नव्हे तर नावीन्यही वाढवावे लागेल.'

यावेळी, त्यांनी भारतातील पुराचाही उल्लेख केला. चार्ल्स पुढे म्हणाले की, हवामान बदलामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये भीषण पूर आला. याशिवाय अमेरिका, कॅनडा आणि ग्रीसच्या जंगलातही आग लागली होती. जर आपण वेगाने सुधारणा केली नाही तर समतोल बिघडेल. हवामान बिघडल्यानंतर जगाची अर्थव्यवस्थाही कोलमोडून जाईल.

चार्ल्स पुढे म्हणाले की, हवामान बदलाबाबत आपल्या सर्वांच्या आशा तुमच्या हातात आहेत. या आशा आपण जिवंत ठेवल्या पाहिजेत. किंग चार्ल्स यांनी 2021 मध्ये स्कॉटलंडमध्ये झालेल्या शिखर परिषदेलाही हजेरी लावली होती. मात्र, गेल्या वर्षी इजिप्तमध्ये झालेल्या परिषदेला आले नव्हते. यावेळी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, 'आपण जीवाश्म इंधन जाळणे पूर्णपणे बंद केले तरच आपण जगाचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसने कमी करु शकतो.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा… कोकण रेल्वेनं लाँच केलं 'KR Mirror' अ‍ॅप, एका क्लिकवर मिळणार A टू Z माहिती

Watch Video:"जेणें तुमकां पेजेक लायलां तें सरकार तुमकां जाय?सरदेसाईंचा तरुणांना सवाल; बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर

Maoist Sujata Surrender: कुख्यात माओवादी सुजाताचे 43 वर्षानंतर आत्मसमर्पण; सरकारने जाहीर केले होते एक कोटी रुपयांचे बक्षीस

Viral Video: 'क्रिकेटचा देव' थोडक्यात बचावला, जंगलात मदतीची वाट पाहत बसला; सचिनसोबत नेमकं घडलं काय? पाहा व्हिडिओ

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

SCROLL FOR NEXT