UN Agency: हवामान बदलाचे घातक परिणाम; 50 वर्षांत 20 लाख मृत्यू, $4.3 ट्रिलियनचे नुकसान!

जगभरात हवामान बदलाचे वारे वाहू लागले आहे. दिवसेंदिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
Extreme weather
Extreme weatherDainik Gomantak
Published on
Updated on

UN Agency: जगभरात हवामान बदलाचे वारे वाहू लागले आहे. दिवसेंदिवस तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यातच आता, युनायटेड नेशन्स (UN) एजन्सीने सोमवारी सांगितले की, गेल्या 50 वर्षांत हवामानाच्या घटनांमुळे 2 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर $4.3 ट्रिलियनचे आर्थिक नुकसान झाले आहे.

विकसनशील देशात सर्वाधिक मृत्यू: WMO

डब्ल्यूएमओने सांगितले की, सर्वात जास्त आर्थिक नुकसान विकसित युनायटेड स्टेट्समध्ये झाले आहे, तर सर्वाधिक मृत्यू विकसनशील देशांमध्ये झाले आहेत. 1970 आणि 2021 मध्ये सर्वाधिक आर्थिक नुकसान युनायटेड स्टेट्समध्ये झाले - एकूण $1.7 ट्रिलियन - तर जगभरातील 10 पैकी नऊ मृत्यू विकसनशील देशांमध्ये झाले.

Extreme weather
UN Report: 'हा' देश महिलांना देतोय सर्वात वाईट वागणूक, यूएनने जारी केला अहवाल

डब्ल्यूएमओचे सरचिटणीस पेटेरी तालास म्हणाले की, या महिन्यात म्यानमार (Myanmar) आणि बांगलादेशात आलेल्या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. मोचा चक्रीवादळाने या दोन्ही देशात मोठ्याप्रमाणात जीवीतहानीसह आर्थिक हानी पोहोचवली.

Extreme weather
VIDEO: जिनिव्हातील UN ह्यूमन राइट्स ऑफिसबाहेर भारताविरोधात प्रोपगंडा !

दरम्यान, हे निष्कर्ष WMO च्या अ‍ॅटलास ऑफ मॉर्टॅलिटी अँड इकॉनॉमिक लॉसेस फ्रॉम वेदर, क्लायमेट आणि वॉटर एक्स्ट्रीम्सच्या अपडेटचा भाग होते, ज्यात पूर्वी 2019 पर्यंत जवळपास 50 वर्षांचा कालावधी समाविष्ट होता.

WMO चे क्षेत्रनिहाय निष्कर्ष

आफ्रिकेमध्ये, WMO ने 1,800 पेक्षा जास्त आपत्ती आणि 733,585 मृत्यू झाले. 2019 मधील उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने तब्बल $2.1 अब्ज एवढे नुकसान केले. नैऋत्य पॅसिफिकमध्ये जवळपास 1,500 आपत्ती आल्या, ज्यामुळे 66,951 मृत्यू आणि $185.8 अब्ज आर्थिक नुकसान झाले.

आशियाला 3,600 हून अधिक आपत्तींचा सामना करावा लागला, ज्यात 984,263 लोकांचा जीव गेला आणि $1.4 ट्रिलियन आर्थिक नुकसान झाले. तर दक्षिण अमेरिकेत 943 आपत्ती आल्या ज्यामध्ये 58,484 मृत्यू आणि $115 अब्ज आर्थिक नुकसान झाले.

तसेच, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये 2,100 हून अधिक आपत्तींमुळे 77,454 मृत्यू आणि $2 ट्रिलियन आर्थिक नुकसान झाले. युरोपमध्ये (Europe) जवळपास 1,800 आपत्ती आल्या, ज्यामुळे 166,492 मृत्यू आणि $562 अब्ज आर्थिक नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com