Kim Jong Un यांनी 2025 पर्यंत जनतेला कमी अन्न खाण्याचे आदेश दिले आहेत. Dainik Gomantak
ग्लोबल

किम जोंग उन यांचा अजब फतवा, जनतेला 2025 पर्यंत कमी अन्न खाण्याचे दिले आदेश

उत्तर कोरियामध्ये (North Korea) बेरोजगारी आणि उपासमारीची (Starvation) समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. उपासमारीने सुमारे तीस लाख लोक मारले गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर कोरियामध्ये (North Korea) बेरोजगारी (Unemployment) आणि उपासमारीची (Starvation) समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. लोक अन्न संकटाने आसुसलेले आहेत. दरम्यान, उत्तर कोरियातील लोकांना मदत करण्याऐवजी हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी एक अजब फर्मान काढले आहे. किम जोंग उन यांनी 2025 पर्यंत जनतेला कमी अन्न खाण्याचे आदेश दिले आहेत.

किम जोंग उन यांनी अन्न संकटाची अनेक कारणे दिली आहेत. जोंग म्हणाले, 'लोकांचे अन्न संकट खूपच चिंतेचा विषय बनत चालला आहे. कारण कृषी क्षेत्र अन्न उत्पादनाच्या योजनेत अपयशी ठरले आहे.' एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी किम म्हणाले होते की हे संकट 2025 पर्यंत टिकेल. तेथील अधिकाऱ्यांचे देखील म्हणणे आहे की, उत्तर कोरिया आणि चीनमधील व्यापार 2025 च्या आधी सुरु होईल असे वाटत नाही.

सध्याच्या आर्थिक संकटाचा संबंध 1990 च्या दुष्काळ आणि आपत्तीच्या काळाशी जोडला जात आहे. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतरच्या दुष्काळात नागरिकांना एकत्र आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी 'टफ मार्च' ही संज्ञा स्वीकारली होती. सोव्हिएत युनियन हे प्योंगयांगच्या कम्युनिस्ट संस्थापकांचे प्रमुख समर्थक होते. त्याच्या पतनानंतर आलेल्या उपासमारीने सुमारे तीस लाख उत्तर कोरियाचे लोक मारले गेले.

उत्तर कोरियातील लोक तांदळाच्या तुलनेत मका कमी खाणे पसंत करतात, परंतु सध्या ते तांदळाच्या तुलनेत स्वस्त आहे, त्यामुळे ते जास्त खाल्ले जात आहे. सध्या राजधानी प्योंगयांगमध्ये एक किलो तांदळाची किंमत डिसेंबर 2020 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहे. किमतीत चढ-उतार सुरु असून, बाजारभावावर नजर ठेवून आर्थिक घडामोडींचा अंदाज लावला जात आहे.

उत्तर कोरियातील तज्ञ बेंजामिन सिल्बरस्टीन म्हणाले, उत्तर कोरियातील बहुतेक लोक बाजारातून खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT