Khawar Maneka| Imran Khan| Bushra Bibi Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यात... नोकराच्या खुलाशाने पाकिस्तानात खळबळ

Bushra Bibi: तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. दरम्यान, इम्रान खानचे वैयक्तिक जीवनही अनेक चढ-उतारांमधून जात आहे. पत्नी बुशरा बीबीच्या माजी पतीच्या नोकराने इम्रानबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ashutosh Masgaunde

Khawar Maneka's servant Muhammad Latif has claimed that Imran Khan had an illicit relationship with Bushra Bibi before marriage:

गेल्या वर्षभारापासून पाकिस्तानच्या राजकारणात येत असलेले भूकंप थांबायचे नाव घेत नाहीत. या राजकीय गोंधळात इम्रान खान सध्या खूप अडचणीत असल्याचे दिसत आहे.

तुरुंगात असलेल्या इम्रान खानवर अनेक आरोप ऐकायला मिळतात,न्यायालयातील सुनावणीवेळी काही प्रकरणांमध्ये तारीख वाढली तर काही प्रकरणांमध्ये ते अडचणीत येत आहेत.

दरम्यान, इम्रान खानचे वैयक्तिक जीवनही अनेक चढ-उतारांमधून जात आहे. पत्नी बुशरा बीबीच्या माजी पतीच्या नोकराने इम्रान यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. इम्रान खान यांचे लग्नापूर्वीच पत्नी बुशरा बीबीसोबत अवैध संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचे माजी पती खावर फरीद मनेका यांच्या नोकराने न्यायालयासमोर दावा केला आहे की, माजी पंतप्रधान सतत बुशरा बीबी यांंच्या माजी पतीच्या घरी सतत येत असत जेथे बुशरा बीबी राहायच्या. त्यांच्यामध्ये अवैध संबंध होते. ते दोघेही एकत्र तासंतास एका खोलीत असायचे.

'बुशरा आणि इम्रान मला खोलीबाहेर जायला सांगायचे'

नोकर लतीफने न्यायाधीशांसमोर दावा केला की, जेव्हा मी खोलीत जायचो तेव्हा ते दोघे माझ्याशी गैरवर्तन करायचे आणि बाहेर जायला सांगत.

दोघांमध्ये अवैध संबंध असल्याचा दावाही यावेळी नोकर लतीफने केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान भ्रष्टाचारासह अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत.

वैयक्तिक आयुष्यातही ते अनेक वादात सापडले आहेत. दरम्यान, पत्नी बुशरा बीवीचे माजी पती खावर मनेका यांनी इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या आरोपांमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. इम्रान यांची पत्नी बुशरा बीवी यांचे माजी पती मनेका यांनी इम्रान खानवर आरोप केला आहे की, 'इमरानने आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केले आहे.'

'इमरान आणि बुशराचे लग्न वैध नाही'

एक्सप्रेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने मंगळवारी वृत्त दिले की, मनेका यांचा कर्मचारी मुहम्मद लतीफ याने इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या बेकायदेशीर लग्नाशी संबंधित एका प्रकरणात खुलासा केला आहे.

हे प्रकरण न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे, जे त्याची स्वीकृती निश्चित करणार आहेत.

मेनका यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, इम्रान आणि बुशरा बीबीचे लग्न इद्दत दरम्यान झाले होते. हा मुस्लीम महिलेचा तिच्या पतीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतरचा प्रतीक्षा कालावधी आहे. या कालावधीत झालेला विवाह वैध नसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT