Mapusa Court: खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरार आरोपींचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण

म्हापसा पोलिसांनी केली अटक
Mapusa Court
Mapusa CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Police: खूनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या दोन आरोपींनी म्हापसा न्यायालयासमोर आत्मसमपर्ण केले आहे. संदीप मेघनाथ कांदोळकर आणि नवनाथ मेगनाथ कांदोळकर अशी या दोन संशयित आरोपींची नावे आहेत.

ते दोघेही मूळचे वाडे, सुकूर बार्देश, गोवा येथील रहिवासी आहेत. 25 मे रोजी हळदोणा येथे खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी या दोघाही संशयितांना अटक केली आहे.

Mapusa Court
Peddem Accident: पेडे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींचा अपघात; दांपत्यासह तरूण जखमी

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी म्हणाले की, 25 मे रोजी कालिदास रोहिदास बोर्डेकर (रा. वैगिनवाडो, नचिनोला, बार्देश) यांनी त्यांचा भाऊ पुंडलिक बोर्डेकर आणि त्यांचा मित्र साल्वाडोर फेर्राव यांच्यावर संदीप कांदोळकर याने हल्ला केला होता.

नवनाथ कांदोळकर व इतरांनी रॉड, हॉकी स्टिक, चाकू इत्यादीचा वापर करून पुंडलिक बोर्डेकर, साल्वाडोर फेर्राव यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

म्हापसा पोलिसांनी पथक तयार करून आरोपी संदीप कांदोळकर आणि नवनाथ कांदोळकर यांचा बेळगाव, कोल्हापूर येथे शोध घेतला. संदीप कांदोळकर आणि नवनाथ कांदोळकर यांनी अटकेपासून बचावासाठी जिल्हा सत्र न्यायालय पणजीत धाव घेतली होती. तपासाच्या नोंदीवरून न्यायालयाने आरोपींना दिलासा देण्याचा अर्ज फेटाळला.

Mapusa Court
Mapusa Police: अल्पवयीन मुलीचे म्हापशातून अपहरण? मित्रही दोन दिवसापासून गायब; पोलिस तपासात समोर आले वेगळेच सत्य...

त्यानंतर दोन्ही आरोपींनी पर्वरी येथे उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र खटल्याच्या कागदपत्रांचा अभ्यास करून सुनावणीच्या तारखेला दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले.

त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीताकांत नायक, पोलिस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com