Khalistani terrorists put up wanted posters of PM Modi, S Jaishankar and Indian High Commissioner Sanjay Kumar Verma outside the Gurdwara. Dainik Gomantak
ग्लोबल

India-Canada: कॅनडा खलिस्तान्यांना कधी आवरणार? गुरुद्वाराबाहेर लावले 'मोदी-जयशंकर वॉन्टेड'चे पोस्टर

Hardeep Singh Nijjar: दहशतवादी निज्जरच्या हल्लेखोरांचा खुलासा कॅनडाच्या पोलिसांना अद्याप करता आलेला नाही, त्यामुळे भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंधांवर परिणाम झाला आहे. नुकतेच SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने भारतावर हमाससारखा हल्ला करण्याची धमकी दिली होती.

Ashutosh Masgaunde

Khalistani terrorists put up wanted posters of PM Modi, S Jaishankar and Indian High Commissioner Sanjay Kumar Verma outside the Gurdwara:

कॅनडात भारताविरुद्ध खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. ताज्या घटनेत खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडातील सरे येथील गुरुद्वारावर आक्षेपार्ह पोस्टर लावले आहे.

या पोस्टरवर पीएम मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ओटावा येथील भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांची छायाचित्रे आहेत. या पोस्टरमध्ये त्यांना 'वॉन्टेड' दाखवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पोस्टर ब्रिटीश कोलंबियातील सारे येथील गुरुद्वाराच्या बाहेर लावण्यात आले आहे. त्यात पीएम मोदी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांची नावे आणि छायाचित्रांचाही समावेश आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आहे, परंतु गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांच्याकडून कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे.

शिख फॉर जस्टिस (SFJ) या फुटीरतावादी गटाचे नाव होर्डिंग्ज लावण्यात समोर येत आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

हे पोस्टर जेथे लावण्यात आले आहेत, ते सरेमधील तोच गुरुद्वारा आहे, जिथे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणातील हल्लेखोरांचा खुलासा कॅनडाच्या पोलिसांना अद्याप करता आलेला नाही, त्यामुळे भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंधांवर परिणाम झाला आहे.

नुकतेच SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी भारताला धमकी दिली होती की त्यांचे शब्द पाळले नाहीत तर भारतावर हमाससारखा हल्ला केला जाईल.

कॅनडामध्ये (Canada) भारतीयाच्या नावाने 'वॉन्टेड' पोस्टर लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कॅनडामध्ये अनेकदा अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

गेल्या महिन्यात कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येनंतर एका गुरुद्वारामध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हत्येला चिथावणी देणारे पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT