Canada-India Row: 6 लोक, 90 सेकंद अन् 50 गोळ्या! समोर आला खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा थरार

Hardeep Singh Nijjar: दरम्यान, गुरुद्वाराचे केअरटेकर चरणजीत सिंग निज्जरच्या मृतदेहाजवळ होते. त्यांनी कोणीतरी ते दृश्य रेकॉर्ड करताना पाहिले, परंतु त्याला ओळखता आले नाही. काही वेळाने निज्जर यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
Khalistani Terrorist Hardeep Singh NijjarDainik Gomantak
Published on
Updated on

6 people, 90 seconds and 50 bullets! Washington Post Reveals The thrill of the killing of Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar: गेल्या आठवडाभरापासून भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे वातावरण आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे.

ट्रुडो यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय भारतावर आरोप केले ज्याचा भारत सरकारने इन्कार केला. भारत सरकारचे एजंट आणि मारण्यात आलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर यांच्यात संबंध असल्याचे ट्रूडो यांनी म्हटले आहे.

पण आता अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने एका व्हिडिओचा हवाला देत खळबळजनक दावा केला आहे. या वर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये 6 लोकांचा सहभाग असल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे.

निज्जर भारतापासून वेगळे होत खलिस्तानी देशाची मागणी करत होता. जुलै 2020 मध्ये भारताने त्याला 'दहशतवादी' घोषित केले होते.

वॉशिंग्टन पोस्टने उलगडला 90 सेंकदाचा थरार...

निज्जरची हत्या झालेल्या स्थळापासून 100 मीटर अंतरावर गुरुद्वाराचे स्वयंसेवक भूपिंदरजीत सिंग फुटबॉल खेळत होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांना वाटले कोणीतरी फटाके फोडत आहे. पण पुढच्याच क्षणी त्याला वाटले की, हा गोळीबाराचा आवाज आहे.

या घटनेनंतर भूपिंदरजीत सिंग यांनी निज्जरला पहिले. ते त्याच्या गाडीपाशी पोहचले आणि ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडून निज्जरचा खांदा धरला. तोपर्यंत निज्जरचा श्वास थांबला होता. भूपिंदर यांच्या म्हणण्यानुसार, तेथे रक्त आणि काचा पसरलेल्या होत्या. काडतुसाच्या केसेस जमिनीवर पडल्या होत्या.

गुरुद्वाराचा दुसरा नेता गुरमीत सिंग तूर यांनी मागून ट्रक बाहेर काढला. त्यात भूपिंदरही चढले आणि दोघांनीही हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र, त्यांना कोणीही सापडले नाही.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाला?

गुरुद्वारा समितीचे सदस्य मलकित सिंग हेही घटना घडली तेव्हा जवळच्या मैदानात फुटबॉल खेळत होते. त्यांनी कुगर क्रीक पार्कच्या दिशेने दोन टोप्या घातलेल्या पुरुषांना धावताना पाहिले. ते त्यांच्या मागे उद्यानात गेले.

मला त्या लोकांना ओळखता आले नसल्याचे मलकित सिंग यांनी सांगितले. त्यांचा पेहराव शीखांसारखा होता. त्यांनी त्यांच्या छोट्या पगडीवर हुडी घातली होती. आणि मास्क घातला होता.

मलकित यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांपैकी एक हा सुमारे पाच फूट उंच आणि जाड होता. दुसरा त्याच्यापेक्षा 4 इंच उंच आणि दुबळा होता. दोघेही पार्कमधून पुलाच्या दिशेने पळत सुटले आणि वाट पाहत थांबलेल्या सिल्व्हर कारमध्ये बसले.

मलकित सिंगने सांगितले की, सिल्व्हर कारमध्ये आणखी तीन लोक होते. त्याला त्यांचे चेहरे दिसत नव्हते. धावत्या मारेकऱ्यांपैकी एकाने गाडीत बसण्यापूर्वीच त्याच्याकडे पिस्तूल रोखले.

दरम्यान, गुरुद्वाराचे केअरटेकर चरणजीत सिंग निज्जरच्या मृतदेहाजवळ होते. त्याने कोणीतरी ते दृश्य रेकॉर्ड करताना पाहिले, परंतु त्याला ओळखता आले नाही. काही वेळाने निज्जर यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला. निज्जर मारला गेल्याचीही पुष्टी झाली.

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
पाकिस्तानात लपलाय खलिस्तानी दहशतवादी, जाणून घ्या इंटरपोल अन् रेड कॉर्नर नोटीस नक्की काय असते

व्हायरल व्हिडिओ

ब्रिटिश कोलंबिया शीख गुरुद्वारा कौन्सिलचे प्रवक्ते मोनिंदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, नुकतेच निज्जरच्या मेकॅनिकला त्याच्या ट्रकच्या चाकांमध्ये एक ट्रॅकिंग डिव्हाइस सापडले.

निज्जरच्या हत्येचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ ९० सेकंदांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुद्वाराच्या पार्किंगमधून निज्जर याचा राखाडी रंगाचा ट्रॅक बाहेर पडताना दिसत आहे.

स्क्रीनवर एक सिल्वर कार दिसते आणि ती देखील ट्रकच्या समांतर धावताना दिसत आहे. यानंतर ती ट्रकला ओव्हरटेक करते आणि त्यानंतर ट्रकच्या पुढे येते. त्यानंतर कारमधून दोन लोक बाहेर पडून निज्जरवर गोळीबार सुरू करतात.

Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar
India-Canada: संतापजनक व्हिडिओ व्हायरल, खलिस्तान समर्थकांकडून तिरंग्याची जाळपोळ

हल्लेखोरांनी झाडल्या 50 गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी निज्जरवर सुमारे 50 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 34 गोळ्या निज्जरला लागल्या. यावेळी निज्जरला हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. निज्जरचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com