SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn Dainik Gomantak
ग्लोबल

Gurpatwant Singh Pannun: ''निज्जरच्या हत्येचा बदला घेणार''; भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी राजदूताला दहशतवादी पन्नूची धमकी

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannun: गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला आणि संधू यांना निज्जरचा खूनी ठरवत ही धमकी दिली.

Manish Jadhav

Taranjit Singh Sandhu Joins BJP:

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजीत सिंग संधू यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला आणि संधू यांना निज्जरचा खूनी ठरवत ही धमकी दिली. पन्नू म्हणाला की, 'हरदीप सिंग निज्जरला मारण्यात तरनजीत संधू यांचा हात होता.' व्हिडिओमध्ये पन्नू पुढे म्हणाला की, ''जर कोणी संधू यांना निज्जरच्या हत्येबद्दल प्रश्न विचारला तर त्याला 25 लाखांचे बक्षीस दिले जाईल आणि जर कोणी संधू यांना खूनाच्या आरोपात अडकवले तर त्याला आणखी बक्षीस दिले जाईल.''

दरम्यान, पोलीस (Police) या व्हिडिओचा तपास करत आहेत. संधू यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येत आहे. हा व्हिडिओ एका अज्ञात यूट्यूब चॅनलवरुन अपलोड करण्यात आला असून तो रात्रीचा बनवण्यात आला आहे. तो एक मिनिट 23 सेकंदांचा आहे. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने संधू यांनी 'भारत सरकारचा एजंट' संबोधले. त्याने सांगितले की, तेच मूळ आहेत, ज्यांनी निज्जरची हत्या केली. वॉशिंग्टन डीसीमध्ये राहत असताना त्यांनी कॅनडामधील त्यांचे मित्र वर्मा यांच्या मदतीने निज्जरची हत्या केली.

पन्नू पुढे म्हणाला की, ''भाजप संधू यांना अमृतसरमधून लोकसभेचे उमेदवार बनवू इच्छित आहे. याआगोदर 1984 च्या शीख दंगलीतील दोषींना लोकसभा सदस्य बनवण्यात आले. निज्जरच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असे शिख्स फॉर जस्टिसने जाहीर केले. यासाठी माझ्या संस्थेने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.''

भाजप अमृतसरमधून लोकसभेचे तिकीट देऊ शकते

अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष त्यांना अमृतसरमधून लोकसभेचा उमेदवार बनवू शकतो, अशी चर्चा आहे. तरनजीत हे पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील राय बुर्जचे रहिवासी आहे. तरनजीत यांचे वडील बिशन सिंग हे शिक्षणतज्ज्ञ होते. ते गुरु नानक देव विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु होते. तरनजीत यांचे आजोबा सरदार तेजा सिंग संमुद्री शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समिती आणि शीख लीगमध्ये सक्रिय होते. ते काँग्रेसचे राष्ट्रीय नेते होते.

श्रीलंका आणि अमेरिकेत काम केले

तरनजीत सिंग संधू हे श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त आणि अमेरिकेतील (America) भारताचे 28 वे राजदूत राहिले आहेत. संधू 1988 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. युक्रेनमध्ये भारतीय दूतावास उघडण्यात तरनजीत सिंग संधू यांची महत्त्वाची भूमिका होती. तरनजीत सिंग यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयातही विविध पदांवर काम केले आहे. त्यांची पत्नी रीनत संधू या इटलीमध्ये भारताच्या राजदूत राहिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT