Gurpatwant Singh Pannun: पन्नू प्रकरणात भारताविरुद्ध खटला लढवणार 'हा' वकील; हायप्रोफाईल प्रकरणात अमेरिकन सरकारला...

Damian Williams: अमेरिकेने पन्नूच्या हत्येचा कथित कट हाणून पाडल्याचा दावा केला असून त्यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
Damian Williams
Damian Williams Dainik Gomantak
Published on
Updated on

Khalistani Terrorist Gurpatwant Singh Pannun: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेच्या भूमीवर रचल्याचा आरोप भारतावर करण्यात आला आहे. असा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेने पन्नूच्या हत्येचा कथित कट हाणून पाडल्याचा दावा केला असून त्यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने या प्रकरणी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात खटलाही दाखल केला आहे. यामध्ये निखिल गुप्ता नावाचा भारतीय नागरिक आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येचा प्लॅन आखल्याचा आरोप आहे. पन्नू हा अमेरिकन नागरिक आहेत. तर भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. पन्नूवर भारतात दोन डझन गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, या सगळ्यामध्ये एक नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे डेमियन विल्यम्स. 43 वर्षीय विल्यम्स हे फेडरल प्रोसिक्यूटर आहेत आणि त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटचा चेहरा मानल्या जाणाऱ्या विल्यम्स यांनी अनेक हायप्रोफाईल केसेसवर काम केले आहे.

Damian Williams
Gurpatwant Singh Pannun: दहशतवादी पन्नूला मृत्यूची भीती; बायडन प्रशासनाकडे केली सुरक्षेची याचना!

डेमियन विल्यम्स कोण आहे?

डेमियन विल्यम्स हे न्यूयॉर्कच्या दक्षिणी जिल्ह्याचे वकील आहेत. ते यूएस सरकारसाठी मॅनहॅटनमधील सर्वात शक्तिशाली वकिलांपैकी एक आहे. विल्यम्स हे सदर्न डिस्ट्रिक्ट न्यायालयाचे वकील बनणारे पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. 1789 मध्ये सदर्न डिस्ट्रिक्टची स्थापना झाल्यापासून, इथे एकही कृष्णवर्णीय वकील झाला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नामनिर्देशित केल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांच्या नावाला सिनेटने मंजुरी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर विल्यम्स म्हणाले की, 'अमेरिकेच्या आर्थिक बाजारपेठेतून भ्रष्टाचार दूर करणे हे त्यांच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे.' एक वकील म्हणून, विल्यम्स सर्व फौजदारी आणि दिवाणी खटले लढवतात ज्यात यूएस सरकारला स्वारस्य आहे.

जस्टिस डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, विल्यम्स यांच्या कर्मचार्‍यांमध्ये अंदाजे 450 वकील, विशेष एजंट, पॅरालीगल आणि इतर सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. विल्यम्स हे अॅटर्नी जनरल अॅडव्हायझरी कमिटी (AGAC) चे अध्यक्ष देखील आहेत. अॅटर्नी जनरलला सल्ला देणारी वकिलांची ही समिती आहे.

Damian Williams
SFJ Chief Gurpatwant Singh Pannun UTurn: ''मी एअर इंडियावर बहिष्कार टाकण्याबाबत....'', गुरपतवंत सिंग पन्नूचा यूटर्न

जमैकाहून हे कुटुंब अमेरिकेत आले

विल्यम्स यांचा जन्म ब्रुकलिन इथे झाला. त्यांचे कुटुंब 1970 च्या दशकात जमैकामधून अमेरिकेत स्थलांतरित झाले. विल्यम्स यांनी त्यांचे बालपण अटलांटामध्ये घालवले. त्यांच्या वडिलांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले होते. तर, त्यांची आई नर्सिंगची विद्यार्थिनी होती. विल्यम्स हार्वर्ड आणि येल विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांनी हार्वर्डमधून अर्थशास्त्रात बॅचलर पदवी मिळवली आहे. याशिवाय, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. वकिलीसोबतच विल्यम्स काही काळ राजकारणातही राहिले आहेत. 2004 मध्ये त्यांनी जॉन केरी यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात क्षेत्र संघटक म्हणूनही काम केले होते.

विल्यम्स यांनी अनेक हाय प्रोफाईल केसेस लढवल्या आहेत

न्यूयॉर्कच्या सदर्न डिस्ट्रिक्टचे वकील म्हणून, विल्यम्स यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक हाय-प्रोफाइल केसेस हाताळल्या आहेत. तथापि, पन्नू प्रकरण इतके सोपे असणार नाही, कारण ते भारत आणि अमेरिकेसाठी राजनैतिक आव्हान आहे. या प्रकरणी विल्यम्स म्हणतात की, 'न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट भारताकडून रचण्यात आला. अमेरिकेच्या भूमीवर अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. अलीकडेच, अमेरिकन फर्म FTX चे संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना मनी लाँड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. सॅम बँकमनला क्रिप्टो किंग असेही म्हटले जाते. विल्यम्सन यांनी त्यांच्याविरुद्ध खटला लढवला होता.

Damian Williams
America: डिहायड्रेशन झाले म्हणून पिले खूप पाणी; अमेरिकेत दोन मुलांच्या आईचा मृत्यू

भारत काय करतोय?

भारताने अमेरिकेच्या या आरोपांचे वर्णन 'चिंतेची बाब' असे केले आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती चौकशी करणार असल्याचे सांगितले. भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले की, भारत सरकारने चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. हे एक चांगले आणि योग्य पाऊल आहे. आणि आम्ही या तपासणीचे परिणाम पाहण्यास उत्सुक आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com