Indira Gandhi Assassination Parade Dainik Gomantak
ग्लोबल

Indira Gandhi Assassination Parade: कॅनडात इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्रण; खलिस्तान्यांची भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने

Indira Gandhi's Killing: खलिस्तानी तत्वांनी व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली. यादरम्यान या फुटीरतावादी तत्वांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची छायाचित्रे प्रदर्शित केली.

Manish Jadhav

Celebration of Indira Gandhi's Killing: भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध मागील काही महिन्यांपासून कमालीचे ताणले गेले आहेत. खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाकडून करण्यात आला होता. खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यामध्ये भारतीय एजटंचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंधात कटुता आली.

यातच आता, कॅनडामधून (Canada) आलेल्या बातमीने पुन्हा एकदा भारताची चिंता वाढवली आहे. गुरुवारी ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्धापनदिनानिमित्त, खलिस्तानी तत्वांनी व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने केली. यादरम्यान या फुटीरतावादी तत्वांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची छायाचित्रे प्रदर्शित केली. फुटीरतावादी तत्वांच्या या हरकतीने भारत चवताळला आहे. भारत सरकारने हे प्रकरण औपचारिकपणे कॅनडासमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या निदर्शनादरम्यान इंदिरा गांधींना गोळ्या झाडण्यात आल्याचे छायाचित्र स्पष्टपणे दिसत आहे. इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या मारेकऱ्यांपैकी एक बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा पंजाबच्या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला आहे.

दरम्यान, कॅनडामध्ये फुटीरतावाद्यांचे धाडस आणि त्यांना किती प्रोत्साहन मिळत होते, याचा अंदाज ते भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेरील त्यांच्या जमावावरुन लावता येतो. जमावाने भारतविरोधी घोषणा दिल्या. व्हँकुव्हरशिवाय टोरंटोमध्येही असेच प्रदर्शन झाले. इथे मात्र इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्रण करणारी छायाचित्रे दाखवण्यात आली नाहीत. त्यांनी इथे खलिस्तानी झेंडे हातात घेऊन भारतविरोधी घोषणा दिल्या. याप्रकरणी आम्ही तक्रार करणार असल्याचे एका वरिष्ठ भारतीय राजनयिक अधिकाऱ्याने सांगितले. 40 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या खलिस्तानवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरु केले होते. सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवालेचाही समावेश होता.

निज्जरच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारतातील संबंधही बिघडले

शिख फॉर जस्टिस या खलिस्तानी संघटनेच्या आवाहनावर ही निदर्शने झाली. या संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. गेल्या वर्षी खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या झाली. तेव्हापासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या हत्येत भारतीय एजटंचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. यावर भारताने (India) आक्षेप घेत तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या, असे म्हटले होते. आत्तापर्यंत कॅनडाला या प्रकरणी कोणताही पुरावा सादर करता आलेला नसला तरी त्याने 4 जणांना अटक केली आहे.

इंदिरा गांधींचे छायाचित्र आक्षेपार्ह

इंदिरा गांधींच्या हत्येचे छायाचित्र भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर ज्या प्रकारे दाखवण्यात आले ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. या छायाचित्रात इंदिरा गांधींचे स्वतःचे सुरक्षा कर्मचारी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग कसे गोळ्या झाडून त्यांची हत्या करतात हे दाखवण्यात आले आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सतवंत सिंग याची सुरक्षा जवानांनी तिथे हत्या केली होती. याशिवाय, बेअंत सिंगला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT