Indian Army Dainik Gomantak
ग्लोबल

India Vs China: 'नो फ्लाइंग झोनमध्ये घुसखोरी केल्यास...', भारताने ड्रॅगनला भरला दम !

India: भारत आणि चीनमध्ये अलीकडेच विशेष लष्करी स्तरावरील चर्चा पार पडली.

दैनिक गोमन्तक

India Vs China: भारत आणि चीनमध्ये अलीकडेच विशेष लष्करी स्तरावरील चर्चा पार पडली. दरम्यान, ड्रॅगनने नुकत्याच केलेल्या हवाई हद्दीच्या उल्लंघनावरुन भारताने चर्चेदरम्यान आक्षेप नोंदवला. मेजर जनरलच्या नेतृत्वाखालील भारतीय लष्करी शिष्टमंडळाने मंगळवारी पूर्व लडाखमधील चुशुल-मोल्डो सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या समकक्षांशी बैठक चर्चा केली. यादरम्यान ड्रॅगनला LAC जवळ घिरट्या घालणाऱ्या चिनी लढाऊ विमानांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विशेषत: जूनपासून या प्रदेशात चीनच्या वाढलेल्या हवाई कारवायाबाबत चर्चा करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळात IAF च्या ऑपरेशनल विंगमधील एअर कमोडोरचा समावेश करण्यात आला होता. चिनी विमाने अनेकदा LAC च्या बाजूने 10 किमीच्या नो-फ्लाय झोनमध्ये प्रवेश करतात. भारत (India) आणि चीन (China) यांच्यात शेवटची लेफ्टनंट-जनरल-रँक कॉर्प्स कमांडर-रँक चर्चा 17 जुलै रोजी झाली. मात्र चर्चेनंतर गस्तीवरील लष्करी अडथळे संपवण्याबाबत कोणतीही ठोस पावले चीनकडून उचलली गेली नाही.

दुसरीकडे, या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीनंतर चीनने तैवान सामुद्रधुनीत आक्रमक भूमिका घेतली आहे. चिनी सैनिकांनी तैवानवर (Taiwan) बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT