अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन  Dainik Gomantak
ग्लोबल

Covid-19: राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सोशल मीडियाला धरले धारेवर; केला हत्येचा आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांच्या हत्या करण्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन ((Joe Biden) यांनी सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मवर लोकांच्या हत्या करण्याचा आरोप केला आहे. बायडन म्हणाले की फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोरोना विषाणू आणि लस संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहे. फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे कोरोना विषाणूशी संबंधित खोट्या बातम्या पसरल्या जात असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे,

"या प्लॅटफॉर्मवर असे म्हटले जात आहे की, ही एक अशी महामारी आहे ज्यासाठी लसिकरणाची (ovid-19 and vaccinations) गरज नाही. अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही लोकांनी आपले प्राण गमावले आहेत." असे बायडन यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले होते. (Joe Biden said social media misinformation about Covid-19 and vaccinations)

मात्र राष्ट्राध्यक्षांनी सोशल मिडियावर केलेले हे आरोप फेसबुकने नाकारले. आणि कोरोना साथिला लसीकरण संरक्षण देत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. 

व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी म्हणाले की फेसबुक आणि इतर लोक कोविड लसिकरणाबबात जनजागृती करत नाही. गुरुवारी अमेरिकेमध्ये सीडीसीने 33,000हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद केली असून, सात दिवसांची सरासरी 26,306 पर्यंत पोहोचली आहे, त्यापूर्वीच्या आठवड्यात 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सात दिवसांत रुग्णालयात दाखल होणारी सरासरी संख्या दररोज 2,790 आहे, ही संख्या 36 टक्क्यांनी वाढत आहे. आणि सात दिवसांच्या मृत्यूची सरासरी 211 असून मृत्यू दरात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT