Ismail Haniyah Dinik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: ''ज्यू मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू...'', हमास प्रमुखाने ओकली गरळ; पाकिस्तानकडे मागितली मदत

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध अद्याप संपलेले नाही. गाझा पट्टीत राहणाऱ्या हजारो लोकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेले युद्ध अद्याप संपलेले नाही. गाझा पट्टीत राहणाऱ्या हजारो लोकांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, इस्रायलसोबत सुरु असलेल्या युद्धात हमासचा सर्वोच्च कमांडर इस्माईल हानियाह याने पाकिस्तानकडे मदत मागितली आहे. याशिवाय, त्याने गरळ ओकली असून ज्यू हे जगभरातील मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने वृत्त दिले की, हानियाहने पाकिस्तानला बहादूर म्हटले. हानियाह म्हणाला की, इस्रायलला पाकिस्तानकडून प्रतिकार झाल्यास क्रूरतेचे गुन्हे थांबू शकतात. इस्लामाबाद, पाकिस्तान येथे आयोजित 'अल-अक्सा मशिदीची पवित्रता आणि मुस्लिम उम्माची जबाबदारी' या विषयावरील राष्ट्रीय संवादात हानियाहने हे भाष्य केले.

दरम्यान, हमासला पाकिस्तानच्या पाठिंब्याबद्दल आशा व्यक्त करताना, हानियाहने देशाचे वर्णन 'मुजाहिदीन' (इस्लामसाठी लढणारे लोक) म्हणून केले. इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टिनींनी दिलेल्या 'बलिदानां'चा संदर्भ देत हमास प्रमुख हानियाह म्हणाला की, पाकिस्तान संघर्ष थांबवू शकतो. शिवाय, पवित्र कुराणचे पालन करणार्‍या देशांच्या गाझा पट्टीमध्ये इस्रायलच्या हल्ल्याला विरोध करण्याच्या महत्त्वावर त्याने भर दिला. सुमारे 16,000 पॅलेस्टिनींना अटक करणे आणि पवित्र स्थळांची विटंबना करणे यासह इस्रायलच्या कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे तो म्हणाला.

इस्माईल हानियाहने इस्रायलच्या ताब्यामध्ये वाढ झाल्याचे नमूद केले आणि ओस्लो कराराची अंमलबजावणी न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. हानियाहने इस्लामिक देश आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांविरुद्ध चेतावणी दिली. हानियाह पुढे म्हणाला की, 'इस्रायल संपूर्ण गाझा नष्ट करेल.' आपल्या भाषणादरम्यान इस्माईल हानियाह पुढे म्हणाला की, पॅलेस्टिनींना पाकिस्तानकडून खूप अपेक्षा आहेत. हमास इस्रायलच्या सर्वात आधुनिक शस्त्रास्त्रांचा मुकाबला करत आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी हमास प्रमुखाने ज्यूंना जगभरातील मुस्लिमांचे सर्वात मोठे शत्रू असे वर्णन केले.

इस्रायल हमासला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करत आहे

इस्रायली सैन्याने गाझामधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरावर जमिनीवरुन हल्ले तीव्र केल्यानंतर इस्रायली सैन्य आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये गाझामध्ये तीव्र चकमकी सुरु झाल्या. ताज्या संघर्षामुळे बहुतेक ठिकाणी मदत पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पॅलेस्टिनींसाठी आश्रयाची ठिकाणेही कमी होत आहेत. दक्षिणेला वेढा घातल्या गेलेल्या किनारी भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन होण्याचा धोका आहे. युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे की, या प्रदेशातील 1.8 दशलक्षाहून अधिक लोक (लोकसंख्येच्या 80 टक्क्यांहून अधिक) आधीच त्यांचे घर सोडून निघून गेले आहेत. गाझा शहराच्या मोठ्या भागांसह उत्तरेकडील बराचसा भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT