Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान इराणने उडवून दिली खळबळ; मोठी अंतराळ मोहीम राबवून...

Iran: इराणच्या या अंतराळ मोहिमेवर अमेरिका, इस्रायल आणि जगातील इतर देशांची बारीक नजर आहे.
Missile
MissileDainik Gomantak

Israel-Hamas War: इस्रायल-हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायल-हमास युद्धादरम्यान इराणने असे काही केले ज्यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. एकीकडे इस्रायली सैन्य हमासच्या दहशतवाद्यांशी मुकाबला करत आहे, तर दुसरीकडे इराणने मोठी अंतराळ मोहीम राबवून इस्रायल आणि अमेरिकेला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

युद्धादरम्यान इराणने प्राण्यांनी भरलेले एक कॅप्सूल अवकाशात सोडले आहे. या कॅप्सूलमध्ये एक नाही, दोन नाही तर अनेक प्राणी आहेत. इराणने हे कॅप्सूल अंतराळात सोडल्यानंतर खळबळ उडाली आहे. इराणच्या या अंतराळ मोहिमेवर अमेरिका (America), इस्रायल आणि जगातील इतर देशांची बारीक नजर आहे.

दरम्यान, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इराणने हे प्राणी युद्धादरम्यान अंतराळात का पाठवले?... इराण येत्या काही वर्षांत अंतराळात मोठ्या मानवी मोहिमेची तयारी करत आहे. येत्या काही वर्षांत मानवी मोहिमांच्या तयारीसाठी या 'कॅप्सूल'मधून प्राणी अंतराळात पाठवले आहेत, असे इराणने (Iran) बुधवारी सांगितले. जेणेकरुन पुढील मोहिमेत मानवाला अवकाशात पाठवता येईल. इराणची वृत्तसंस्था IRNA ने दूरसंचार मंत्री इसा जारेपूर यांच्या हवाल्याने सांगितले की, कॅप्सूल 130 किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आले.

Missile
Israel-Hamas War: युद्धविराम संपताच गाझामध्ये पुन्हा इस्रायली हल्ले सुरु, दोन दिवसांत 700 जणांचा मृत्यू; सर्वत्र हाहाकार!

इराणने कोणते प्राणी अवकाशात पाठवले?

दुसरीकडे, या कॅप्सूलचे वजन 500 किलो असल्याचे जारेपूर यांनी सांगितले. त्यात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. येत्या काही वर्षांत इराणी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचा या कॅप्सूलच्या प्रक्षेपणाचा उद्देश आहे. कॅप्सूलमध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत हे त्यांनी सांगितले नाही.

इराण उपग्रह आणि इतर अंतराळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणाची घोषणा करत आहे. सप्टेंबरमध्ये इराणने माहिती गोळा करणारा उपग्रह अवकाशात पाठवल्याचे सांगितले होते. इराणने 2013 मध्ये एक माकड अंतराळात पाठवून यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आणल्याचे सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com