JeM commander Masood Ilyas Kashmiri  Dainik Gomantak
ग्लोबल

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबीयांचे तुकडे झाले; 'जैश'च्या टॉप कमांडरने जाहीरपणे केलं मान्य Watch Video

JeM commander Masood Ilyas Kashmiri Video: आम्ही देशासाठी दिल्ली, काबुल, कंधार याठिकाणी देखील दहशतवादी हल्ला केल्याचे जैश कमांडर मान्य करत आहे.

Pramod Yadav

पाकिस्तान: भारतीय सैन्य दलाने ०७ मे रोजी पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे नऊ ठिकाणांवर हल्ला करत दहशतवादी तळ नष्ट केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्या प्रतित्तुरात भारताने ही सैन्य कारवाई केली होती. पण, या कारवाईत काहीच नुकसान न झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.

भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हल्ला केला. यात बहावलपूर जवळील अहमदपूर शारकियासह मुरिदके, सियालकोट, शाकरगड, मुज्जफराबाद आणि कोटली याठिकाणी भारताने मिसाईल हल्ला केला.

बहावलपूर येथील हल्ल्यात जैश – ए- मोहम्मदच्या मसहूर अजहरच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, पाकिस्तानकडून याचे खंडन करण्यात आले होते. दरम्यान, बहावलपूर येथील हल्ल्यात अजहरच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाल्याची पुष्टी खुद्द जैशच्या कमांडरने केली आहे.

जैश – ए- मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मीरी एका ठिकाणी जाहीरपणे भाषण करताना दिसत आहे. या भाषणात तो ०७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबीयांचे तुकडे तुकडे झाल्याचे सांगताना दिसत आहे.

एवढेच नव्हे तर काश्मीरी आम्ही देशासाठी दिल्ली, काबुल, कंधार याठिकाणी देखील दहशतवादी हल्ला केल्याचे मान्य करत आहे. काश्मीरीच्या समोर आलेल्या या व्हिडिओमुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरचे कुटुंब संपल्याचे निश्चित मानले जात आहे.

मसूद इलियास काश्मीरी सार्वजनिक ठिकाणी करत असलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काश्मीरी भाषण करत असताना त्याच्या भोवती बंदूकधारी सहा ते सात कमांडर दिसत आहेत.

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय सैन्याने प्रसिद्ध केली होती. यात अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवादीही ठार झाल्याचे सैन्याने म्हटले होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तान, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील एकूण नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानी मिलिटरी तळांना लक्ष्य केले नसल्याचे स्पष्ट केले होते.

पहलगाम येथे झआलेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांना धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. भारतीय सैन्याने पहाटेच्या सुमारास पाकिस्तानवर हल्ला केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT