Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Tracy De Sa Rapper: आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव झालेली प्रसिद्ध रॅपर ट्रेसी डी सा ही हिप-हॉप गायिका ही मूळ गोव्याची आहे हे अनेकांना ठाऊक नसेल.‌ तिच्या हिप-हॉप अल्बमवर युवा पिढी थिरकत असते.
Tracy De Sa Goa Rapper
Tracy De Sa Goa RapperDainik Gomantak
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव झालेली प्रसिद्ध रॅपर ट्रेसी डी सा ही हिप-हॉप गायिका ही मूळ गोव्याची आहे हे अनेकांना ठाऊक नसेल.‌ तिच्या हिप-हॉप अल्बमवर युवा पिढी थिरकत असते.

ट्रेसीचा जन्म गोव्यात झाला पण ती अडीच वर्षाची असताना तिच्या कुटुंबीयांनी पोर्तुगालला स्थलांतर केले. त्यानंतर साडेतीन वर्षाची असताना ती स्पेनला पोहोचली. दक्षिण स्पेनमधील मालागा येथे ती मोठी झाली आणि 18 वर्षाची असताना अभ्यासासाठी फ्रान्सला पोहोचली. सध्या ती फ्रान्समध्ये, पॅरिसला  असते आणि संगीत हेच तिचे क्षेत्र आहे.

स्वतःच्या संगीत शैलीबद्दल सांगताना ती म्हणते, 'हिप हॉप हीच माझी संगीत शैली आहे. जरी 90 च्या दशकातील हिप-हॉपची तत्वे माझ्या संगीतात मी जोपासत असले तरी रेगेटन, लॅटिन म्युझिक, डान्स हॉल इत्यादी शैलींचा प्रभावही माझ्या गाण्यांवर आहे.‌ कारण या शैलींचा अनुभव घेत मी वाढले आहे.

नृत्याच्या आवडीमुळे माझा प्रवेश हीप-हॉपमध्ये झाला. मी सर्वप्रथम नृत्यांगना होते. मी नृत्य शिकवायचे, स्ट्रीट-शोमध्ये भाग घ्यायचे. पण जेव्हा मी फ्रान्सला गेले तेव्हा मला काही रॅपर्स भेटले ज्यांनी मला रॅपमध्ये स्वतःला आजमावण्याचा आग्रह केला. सुरुवातीला मी संकोच करत होते कारण मला वाटले की शारीरिक अभिव्यक्ती माझ्यासाठी पुरेशी आहे पण जसजसे मी लिहायला सुरुवात केली मला जाणवू लागले की मला काहीतरी सांगायचे आहे.‌ त्यानंतर मी रॅपचा खोलवर विचार करण्यास सुरुवात केली, माझ्यात दडलेल्या प्रवाहांवर लक्ष केंद्रित केले आणि तिथूनच हे सर्व सुरू झाले.'

इंटरनेटवर असलेली ट्रेसीची पेज जर पाहिली तर तिथे तिने अभिमानाने लिहिलेले आहे, 'मी एक स्त्री आहे. मी स्थलांतरित आहे आणि माझी त्वचा तपकिरी (ब्राऊन) आहे. मी ट्रेसी डी सा आहे!' पुरुषप्रधान या जगात, आव्हानांसोबत आणि स्त्री असण्याचा अभिमान बाळगत ट्रेसी रॅप संगीताने प्रेरित असलेली तिची तंत्रे आणि कौशल्य वापरून हिपहॉप प्रेमींना आपल्या पायांवर थिरकायला लावते. ट्रेसीला हे ठाऊक आहे की तिच्या आयुष्याचा माग घेणे म्हणजे जगाच्या हजारो मैलाच्या मार्गाचे अनुसरण करणे आहे. 

स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगताना ती लिहिते, 'मी, माझी आई आणि माझा भाऊ असे त्रिकोणी केंद्र असलेल्या कुटुंबात मी वाढले. ही विषम संख्या बऱ्याच काळापासून एका वेदनांचे स्रोत होती-जी माझ्या जीवनातील असंतुलनाची सततची आठवण बनवून राहिली आहे.' पण नंतरच्या काळात हेच केंद्र तिचा पाया स्थिर होण्याचा आणि तिच्या प्रेरणांचा स्रोत बनला. ३ या आकड्याकडे ती एक उपचार म्हणून पाहू लागली.

Tracy De Sa Goa Rapper
Inspector Zende Konkani Rap: ..हांव तेका आता पोळोयता! 'इन्स्पेक्टर झेंडे’ला गोवन टच! मनोज वाजपेयीच्या सिनेमात कोकणी रॅपचा कल्ला

जणू दुविधांपासून मुक्त होण्याचा तो तिच्यासाठी एक मार्ग बनला. ती पुढे म्हणते, 'मी कुठलीही गोष्ट काळी किंवा पांढरी, चांगली किंवा वाईट म्हणून पहात नाही. मी नेहमी तिसरा पर्याय शोधते. तिसऱ्या चौकटीत खूण करते. ३ या संख्येची विषमता माझ्यासाठी स्वातंत्र्याची खिडकी उघडणारी बाब आहे.' ट्रेसी स्वतःला तिसऱ्या संस्कृतीचे बाळ मानते. तीन भाषांमध्ये तिचे काम आहे- इंग्रजी, स्पॅनिश आणि फ्रेंच.

Tracy De Sa Goa Rapper
Melvin Noronha: गोमंतकीय डिझायनरचे यश! मरियन-लक्ष्मीचा आशीर्वाद; टॅन्सी रेणू पालने जिंकले 'राष्ट्रीय वेशभूषे'चे पारितोषिक

आपले शरीर, आत्मा आणि मन तसेच आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ संरेखित (align) करणे हेच आपले ध्येय आहे हे तिने आपल्या मनावर ठसवले आहे. आपल्या आयुष्यातील उंच-सखल अशा प्रत्येक काळात आपले विचार शब्द आणि कृतींशी जोडले गेल्याची तिची खात्री आहे. त्यातूनच जीवनासंबंधी गृहीतके, विरोधी तत्वे आणि संश्लेषण तयार झाले आहे असे ती म्हणते. अशाप्रकारे ३ ही संख्या आपल्यासाठी विपुलता, समृद्धी, कल्पनाशक्ती, माहिती आणि स्त्रीतत्त्व यांचे प्रतीक बनले आहे असा विश्वास तिला वाटतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com