Fumio Kishida Dainik Gomantak
ग्लोबल

'इंडो-पॅसिफिकमध्ये युक्रेनसारखी स्थिती होऊ देणार नाही'

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी चीनवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दैनिक गोमन्तक

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी चीनवर जोरदार हल्ला चढवला आहे. इंडो-पॅसिफिकमध्ये युक्रेनसारखी स्थिती होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीदरम्यान त्यांनी अमेरिका-जपान संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. त्याचबरोबर चीनशी दोन हात करण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली. (Japan's PM Fumio Kishida says the Indo-Pacific situation will not be like Ukraine's)

किशिदा म्हणाले की, बळाचा वापर करुन स्थिती बदलू दिली जाणार नाही, त्याचे स्थान काहीही असो. आम्ही पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रात चीनला सातत्याने विरोध केला आहे. चीनवर निशाणा साधत किशिदा म्हणाले की, इंडो-पॅसिफिकमध्ये युक्रेनसारखी स्थिती होऊ दिला जाणार नाही.

दरम्यान, फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी तैवान (Taiwan) सामुद्रधुनीमध्ये शांतता आणि स्थिरतेची गरज अधोरेखित केली. या ठिकाणी चीन तैवानवर सातत्याने दबाव निर्माण करत आहे. जपानी पंतप्रधानांनी मुक्त इंडो-पॅसिफिकच्या गरजेवर भर दिला. वास्तविक, या व्हिजनचा उद्देश चीनी शक्तीला रोखण्याचा आहे. किंबहुना, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून (Russia-Ukraine war) चीन (China) आता तैवानवरही असाच हल्ला करु शकतो, असा सूर आता जोर धरु लागला आहे. यामुळे जगात आणखी एक वाद निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळेच जपान आणि अमेरिका तैवानच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेची हमीही दिली

त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी तैवानवर हल्ल्याचा इशारा दिला. चीनने तैवानवर हल्ला केल्यास लष्करी हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे बायडन यांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तैवानचे रक्षण करण्याचा दबाव वाढल्याचे बायडन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, तैवानविरुद्ध बळाचा वापर करण्याची चीनची चाल केवळ अन्यायकारक ठरणार नाही, तर ते संपूर्ण प्रदेशाला विस्थापित करेल. आणि विशेष म्हणजे युक्रेनमध्ये केलेल्या कारवाईच्या समान असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT