Japan Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

Japan Earthquake Today 7.5 Magnitude: जपानमध्ये निसर्गाच्या रौद्ररुपाने पुन्हा एकदा सर्वांची झोप उडवली.

Manish Jadhav

Japan Earthquake Today 7.5 Magnitude: जपानमध्ये निसर्गाच्या रौद्ररुपाने पुन्हा एकदा सर्वांची झोप उडवली. देशाच्या उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला असून या धक्क्याने संपूर्ण देश हादरुन गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर असल्याने त्याचा प्रभाव अधिक घातक ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर जपान हवामान खात्याने तातडीने त्सुनामीचा इशारा दिला असून समुद्रकिनारी 3 मीटरपर्यंत उंच लाटा धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या धोक्यामुळे किनारपट्टीवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या आहेत.

भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की अनेक भागांत नागरिकांना स्वतःचा तोल सावरणेही कठीण झाले होते. जपानच्या भूकंप मापन श्रेणीनुसार या धक्क्याला 'अप्पर 5' या धोकादायक पातळीवर ठेवण्यात आले. भूकंपाचा (Earthquake) इशारा मिळताच जपान सरकारने तातडीने आणीबाणीची यंत्रणा कार्यान्वित केली. विशेषतः इवाते, आओमोरी आणि होक्काइडो या प्रांतांमधील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी जनतेला आवाहन केले की, त्सुनामीचा धोका लक्षात घेता कोणताही विलंब न लावता तातडीने उंचावरील सुरक्षित ठिकाणी किंवा मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा.

सुरक्षेच्या कारणास्तव जपानमधील (Japan) दळणवळण यंत्रणेवरही मोठे निर्बंध लादण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट ट्रेन सेवा तात्काळ स्थगित करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूकही अनेक ठिकाणी रोखण्यात आली. टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावरुन सतत सतर्कतेचे संदेश प्रसारित केले जात आहेत. संभाव्य त्सुनामीचा तडाखा जहाजांना बसू नये म्हणून बंदरांवरील जहाजे समुद्रात दूरवर नेण्यात आली आहेत. सुदैवाने, अद्याप मोठ्या प्रमाणावर जीवित किंवा वित्तहानी झाल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र प्रशासनाने बचाव पथकांना हाय-अलर्टवर ठेवले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT