आकाशगंगेत पाठविलेल्या सर्वात शक्तिशाली जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने (James Webb Space) विश्वाची चित्तथरारक नवे दृश्ये टिपली आहे. जी यापूर्वी कधीही पाहिलेली नाहीत. विविध आकाशगंगा, तेजस्वी तेजोमेघ आणि महाकाय वायू ग्रह याची चित्रे या टेलीस्कोपने टिपली आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने (NASA) याबाबत माहिती दिलीय.
टेलीस्कोपची देखरेख करणार्या स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट (STSI) मधील खगोलशास्त्रज्ञ क्लॉस पॉन्टॉपिडन यांनी एएफपीला याबाबत माहिती दिली. तसेच सांगितले की, जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपच्या (James Webb Telescope) माध्यमातून अवकाशातील नव्या रहस्यांचा उलगडा करणार आहे. यासाठी मी खूप उत्सुक आहे. नासाचे (NASA) प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले की "अवकाशातून आतापर्यंत विश्वाची घेतलेले सर्वात सुंदर फोटो (Photo) आहेत.
या दुर्बिणीने 30 दिवसांत पृथ्वीपासून 1,609,344 किमी अंतर पार केले आहे. म्हणजेच दररोज सुमारे 53,644 किलोमीटरचा प्रवास पार केला. आता ते 16.09 लाख किमीच्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहे. हा त्याचा शेवटचा वर्ग आहे. यासह अमेरिकन स्पेस एजन्सी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी ईएसए यांनी नवा इतिहास रचला आहे. कारण याआधी अंतराळात (Space) एवढ्या अंतरावर एकही दुर्बीण तैनात करण्यात आली नव्हती.
जगभरातील 40 देशांतील शास्त्रज्ञ वर्षभर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपवर लक्ष ठेवून आहेत. कारण या दुर्बिणीची संकल्पना 30 वर्षांपूर्वी आली होती. याबाबत चांगली गोष्ट म्हणजे या दुर्बिणीला इतर टेलिस्कोपप्रमाणे दुरुस्तीसाठी थांबावे लागणार नाही. त्याची दुरुस्ती आणि अपग्रेडेशन जमिनीवर असलेल्या वेधशाळेतून पाच वेळा करता येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.