Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Army Judiciary: पाकिस्तानात लष्कर, न्यायालयाविरोधात बोलल्यास 'इतकी' वर्षे तुरुंगवास

10 लाख रुपये दंडही आकारणार; पंतप्रधान शाहबाझ शरीफ सरकारचे नवे विधेयक

Akshay Nirmale

Pakistan Army: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान सरकारने तेथील लष्कर आणि न्यायालयांना वादांपासून वाचवण्यासाठी विधेयक तयार केले आहे. त्याअंतर्गत तेथील दंड संहिता आणि सीआरपीसीच्या कलमांमध्ये बदल केले जाणार आहेत.

सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन कलमांतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने लष्कर किंवा तेथील न्यायालयाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली तर त्याला तुरुंगात टाकले जाईल आणि दंडही ठोठावला जाईल.

मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या शिफारशींवर पाकच्या गृह मंत्रालयाने हे विधेयक तयार केले आहे. ज्याची चाचणी पाकिस्तानच्या कायदा आणि न्याय मंत्रालयानेही केली आहे. लवकरच ते मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केले जाईल.

लष्कराची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेने असे फोटो, व्हिडिओ किंवा लेख कोणत्याही व्यासपीठावर प्रकाशित केल्यास किंवा प्रसारित केल्यास तो शिक्षेस पात्र असेल, असे नव्या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

नवीन कलमांतर्गत 5 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. केस मोठी असेल तर त्याला शिक्षा आणि दंड दोन्ही भोगावे लागणार आहेत. नव्या कायद्यानुसार जो कोणी लष्कर किंवा न्यायालयाविरोधात बोलेल त्याला वॉरंटशिवाय अटक केली जाईल आणि जामीनही दिला जाणार नाही.

विधेयकाच्या सारांशात असे म्हटले आहे की, अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या लष्कर आणि न्यायालयांवर अपमानास्पद हल्ले झाले आहेत. काही संस्था आणि लोक स्वतःच्या फायद्यासाठी हे करत आहेत. त्यामुळे देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या अपप्रचारावर लष्कर आणि न्यायालय कोणतेही ठोस पाऊल उचलू शकत नाही.

2021 मध्येही अशाच प्रकारचे विधेयक नॅशनल असेंब्लीच्या स्थायी समितीने मंजूर केले होते. या विधेयकात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती. मात्र, त्यावेळी या विधेयकाला तीव्र विरोध झाला होता. केवळ विरोधी पक्षांनीच नाही तर सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे मंत्री फवाद चौधरी आणि शेरीन मजारी यांनीही याला विरोध केला होता. हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात मानले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT